पॉवर वाढवण्यासाठी त्याने घेतलं रेड्याचं औषध, तीन दिवस हॉस्पिटलमध्ये बसला बोंबलत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 12:10 PM2020-01-15T12:10:58+5:302020-01-15T12:11:47+5:30

काही लोक लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी असे काही प्रयोग करतात जे त्यांना चांगलेच महागात पडतात आणि आयुष्यभरासाठी त्यांना हे लक्षात राहतात.

Man is hospitalised with 3 days erection after taking sexual stimulant used for breeding bulls in mexico | पॉवर वाढवण्यासाठी त्याने घेतलं रेड्याचं औषध, तीन दिवस हॉस्पिटलमध्ये बसला बोंबलत

पॉवर वाढवण्यासाठी त्याने घेतलं रेड्याचं औषध, तीन दिवस हॉस्पिटलमध्ये बसला बोंबलत

Next

काही लोक लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी असे काही प्रयोग करतात जे त्यांना चांगलेच महागात पडतात आणि आयुष्यभरासाठी त्यांना हे लक्षात राहतात. मेक्सिकोतील एका व्यक्तीने असंच काहीतरी केलं आणि तीन दिवस त्याला बोंबलत बसावं लागलं. त्याने जे केलं ते वाचून हसावं की रडावं हे तुम्हाला कळणार नाही.

झालं असं की, मेक्सिकोतील एका व्यक्तीने रेड्याची पॉवर वाढवणारं औषध घेतलं. त्यानंतर त्याची अशी अवस्था झाली की, त्याला तीन दिवस हॉस्पिटलमध्ये भरती रहावं लागलं. इतकेच नाही तर त्याच्यावर सर्जरी करण्याची वेळही आली.

डेली मेलने दिलेल्या एका वृत्तानुसार, मेक्सिकोमध्ये एका व्यक्तीने त्याची लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी रेड्याला दिलं जाणारं औषध घेतलं. पण या औषधाची पॉवर इतकी होती की, त्या व्यक्तीला ती पेलवली नाही. त्यानंतर त्याला यूएस-मेक्सिको सीमेवरील शहर रेनोसा येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या व्यक्तीने हे औषध एका ३० वर्षीय महिलेशी शारीरिक संबंध ठेवताना घेतलं होतं.

डॉक्टरांनी आधी त्याचं रेग्युलर चेकअप केलं आणि त्याच्यावर लगेच सर्जरी केली. एका इंग्रजी वृत्तपत्राला येथील डॉक्टरांनी सांगितले की, 'या व्यक्तीला रेनोसा शहरातील एका स्पेशलाइज्ड हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं होतं. या व्यक्तीने लैंगिक क्षमता वाढवणारं एक औषध घेतलं होतं. हे औषध शेतकरी लोक ब्रीडिंगवेळी रेड्याची पॉवर वाढवण्यासाठी त्यांना देत असतात'. 


Web Title: Man is hospitalised with 3 days erection after taking sexual stimulant used for breeding bulls in mexico

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.