खरं की काय? कोरोनाच्या भितीनं पठ्ठ्या ३ महिने एयरपोर्टवरच राहिला; पोलिसांना कळलं अन् मग.....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 01:09 PM2021-01-19T13:09:59+5:302021-01-19T13:21:56+5:30

१९ ऑक्टोबरला आदित्य लॉस एजंलसवरून विमानाने आला. जेव्हा विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी या माणसाकडे ओळखपत्र विचारलं तेव्हा त्यानं एक बॅच दाखवला.

A man lived in a secure area of chicago airport as he was too afraid to go out because of corona virus | खरं की काय? कोरोनाच्या भितीनं पठ्ठ्या ३ महिने एयरपोर्टवरच राहिला; पोलिसांना कळलं अन् मग.....

खरं की काय? कोरोनाच्या भितीनं पठ्ठ्या ३ महिने एयरपोर्टवरच राहिला; पोलिसांना कळलं अन् मग.....

Next

अजूनही कोरोना व्हायरसच्या प्रसाराबाबत लाखो लोकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे. दरम्यान कोरोना काळातील एक मोठी माहिती समोर आली आहे.  ३६ वर्षांचा एक व्यक्ती विमानतळाच्या सुरक्षेत तीन महिन्यांपर्यंत राहिला कोरोनाच्या भीतीने या माणसानं हे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे. ३६ वर्षीय आदित्य सिंगला शिकागो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. १९ ऑक्टोबरला आदित्य लॉस एजंलसवरून विमानाने आला. जेव्हा विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी या माणसाकडे ओळखपत्र विचारलं तेव्हा त्यानं एक बॅच दाखवला.

ऑपरेशन मॅनेजरचा बॅच आदित्यला विमानतळावरच मिळाला होता. त्यानंतर तीन महिने हा माणूस या विमानतळावरच  होता. शिकागो ट्रिब्यूननं दिलेल्या माहितीनसुार हा माणूस त्या ठिकाणी वावरत असलेल्या प्रवाश्यांकडून मिळत असलेल्या वस्तूंवर आपला उदरनिर्वाह करत होता. त्या ठिकाणची कर्मचारी कूक सुनैना यांना या प्रकाराबाबत माहिती मिळाल्यानंतर खूप आश्चर्य वाटलं. ''एक बेरोजगार तरूण कोरोनाच्या भीतीने एअरपोर्टवरच बेकायदेशीरपणे राहत आहे आणि आतापर्यंत त्याच्यावर कारवाई केली जात नाही, ही गंभीर बाब आहे. '' असं त्या म्हणाल्या.

जज ओर्टीज यांनी सांगितले की, प्रवाशांचा विचार करता विमानतळावर वेगवेगळ्या सोईसुविधा पुरवलेल्या असतात. पण विमानतळावर कोणतंही काम नसताना एक व्यक्ती ३ महिने राहते ही घटना पहिल्यांदाच समोर आली असून आश्चर्यचकीत करणारी बाब आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आदित्य कडे वैद्यकिय विषयातील मास्टरर्स पदवी असून सध्या तो बेरोजगार आहे. आपल्या रुममेट्ससोबत तो लॉसएंजेलंसमध्ये राहत  होता. अरेरे! ४ वर्षांची चिमुरडी हरवली; अन् रिक्षा चालकाच्या प्रयत्नानं आई-बाबांना लेक सुखरूप मिळाली

शिकागो डिपार्टमेंट ऑफ एविएशननं दिलेल्या माहितीनुसार, ''आदित्य तीन महिने एअरपोर्टवर कसा आणि कुठे राहिला याबाबत  माहिती मिळवणं सुरू आहे. विमानतळाच्या सुरक्षेलाच आम्ही प्राधान्य देतो. पडताळणी केल्यानंतर २७ जानेवारीला पुन्हा एकदा आदित्य सिंहचा अहवाल कोर्टात सादर केला जाणार आहे. '' अरेरे! बर्डफ्लूमुळे कोंबड्यांना घेऊन जाताना पाहिलं; अन् तो ढसाढसा रडला, पाहा व्हिडीओ

Web Title: A man lived in a secure area of chicago airport as he was too afraid to go out because of corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.