आपलं स्वत:चं घर असावं आणि ते सुंदर असावं असं सगळ्यांनाच वाटत असतं. काही लोकांची घरे आलिशान असतात तर काही लोक छोट्याशा जागेतही सुंदर घर तयार करतात. आजकाल घरांच्या किंमतीही आकाशाला भिडल्या आहेत. आपल्या आयुष्यभराची कमाई लोक घर घेण्यात घालवतात. पण तुम्हाला जर आम्ही सांगितलं की, एका व्यक्तीने केवळ 105 रूपयात 'घर' खरेदी तर तुमचा विश्वास बसेल का? नक्कीच नाही. पण असं झालंय.
हे घर आहे इंग्लंडच्या डर्बीशायरमध्ये. येथील एका व्यक्तीने फक्त 105 रूपयात 'घर' खरेदी केलं आणि त्या घरात तो पत्नीसोबत राहतो. महत्वाची बाब म्हणजे त्याची घर घेण्याची कहाणीही फारच इंटरेस्टींग आहे.
द सनच्या रिपोर्टनुसार, बॉब कॅम्पबेल आणि त्याची पत्नी कॅरोल एन एका अशा अनोख्या राहतात ज्यावर तुमचा विश्वासही बसणार नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण या घराचं स्ट्रक्चर केवळ 105 रूपयांचं आहे. बॉबने सांगितलं की, तो नशेत असताना त्याने ऑनलाईन ट्रेडिंग वेबसाइट ईबे वर हे घर पाहिलं होतं.
नंतर केवळ 1 पाउंड म्हणजे 105 रूपये देऊन त्याने एक धान्य ठेवण्यासाठीचा मोठा ड्रम खरेदी केला होता. कपल मिळून त्याला आपलं घर बनवलं. हे अनोखं घर बनवण्यासाठी त्याना 6 वर्षे आणि 4 लाख रूपये लागले.
अवाक् करणारी बाब म्हणजे जुन्या बॉटल्स आणि पॅलेट्सचा वापर करून या घराच्या भिंती बनवण्यात आल्या. किचनमध्ये ओवन, हॉब, केटली, सिंकसारख्या वस्तू आहेत. एक बेड लावण्यात आला आहे. वर एक पोटमाळा तयार केला आहे. हे घर केवळ 4 मीटर उंच आणि 4 मीटर गोलाकार आहे.
Living Big in a Tiny House सोबत बोलताना कपलने सांगितलं की, पत्नी कॅरोलला ही आयडिया आधी आवडली नव्हती, पण गेल्या 5 वर्षापासून ते निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या घरात राहतात. त्यांनी आजूबाजूला खूप झाडी लावली आणि एक छोटा तलावही बनवला आहे.