जीवनात पैसा मोठा आहे की मैत्री? विचार करा, कारण या दोन वृद्ध मित्रांच्या मैत्रीबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हीही पैशाला काही वेळ विसरुन जाल. ही घटना अमेरिकेच्या विस्कॉन्सिन येथील आहे. जेथे दोन मित्रांनी एकमेकांना अनोखं वचन दिलं होतं. रिपोर्टनुसार टॉम कुक आणि जोसेफ फेनी यांनी १९९२ मध्ये हँडशेक करुन एकमेकांना प्रॉमिस केले होते त्याची पूर्तता आता झाली.
या दोन्ही मित्रांनी ठरवलं होतं की, जर भविष्यात कधीही दोघांपैकी कोणालाही लॉटरी लागली तर जिंकलेला पैसा हा दोघांमध्ये समसमान वाटला जाईल. दोघांचे हे प्रॉमिस जवळपास २८ वर्षांनी पूर्ण झालं. मागील महिन्यात Menomonie मध्ये कुकने लॉटरी खरेदी केली होती. यात टॉम कुकला जवळपास १६५ कोटींचा जॅकपॉट लागला. ज्यानंतर कुकने तातडीनं त्यांचा मित्र फेनीला कॉल केला आणि जे वचन दिलं होतं त्याप्रमाणे लॉटरीच्या बक्षिसाची रक्कम अर्धी-अर्धी वाटून घेण्याबाबत सांगितले.
टॉमचं म्हणणं ऐकून सुरुवातीला जोसेफ फेनीला विश्वास बसला नाही, तो म्हणाला, भाऊ मस्करी करु नको, त्यावर टॉमने वचन दिलं आहे यार, असं सांगितल्यानंतर दोघंही भावूक झाले, टॉमने सेवानिवृत्ती घेतली आहे तर फेनी पहिल्यापासून निवृत्त आहे. आता आम्ही मनासारखं करु, निवृत्तीसारखा चांगला वेळ असूच शकत नाही, आम्ही जास्त वेळ कुटुंबासोबत राहणार, प्रवास करणार असल्याचं टॉमने सांगितले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
“ज्याची कुवत सगळ्यात कमी लेखली गेली तोच पक्षाचा सर्वोच्च नेता अन् राज्याचा मुख्यमंत्री झाला”
तुकाराम मुंढेंना 'फुल सपोर्ट'; उद्धव ठाकरेंची 'जन की बात'
मी कोणाच्या उज्ज्वल भवितव्याच्या आड येत नाही, पण...; उद्धव ठाकरेंचा नेम अजित पवारांवर?
"अयोध्येला जाणार, राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार!" पण...