बोंबला! इथे एका व्यक्तीच्या पोटातच तयार होते बीअर, हे वाचल्यावरच बसेल तुमचा विश्वास!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 11:37 AM2019-10-25T11:37:04+5:302019-10-25T11:59:40+5:30

बीअर कशी तयार होते जवळपास सर्वांनाच माहीत असावं. बीअर प्यायल्यावर पोटात जाते, पण कधी कुणाच्या पोटातच बीअर तयार होत असल्याचं आतापर्यंत तरी ऐकायला मिळालं नव्हतं.

This man stomach makes beer being arrested for drunk driving finds | बोंबला! इथे एका व्यक्तीच्या पोटातच तयार होते बीअर, हे वाचल्यावरच बसेल तुमचा विश्वास!

बोंबला! इथे एका व्यक्तीच्या पोटातच तयार होते बीअर, हे वाचल्यावरच बसेल तुमचा विश्वास!

Next

बीअर कशी तयार होते जवळपास सर्वांनाच माहीत असावं. बीअर प्यायल्यावर पोटात जाते, पण कधी कुणाच्या पोटातच बीअर तयार होत असल्याचं आतापर्यंत तरी ऐकायला मिळालं नव्हतं. पण आता एक अशी घटना समोर आलीये. अमेरिकेतील एक ४६ वर्षीय व्यक्ती आहे. २०१४ मध्ये या व्यक्तीला दारू पिऊन गाडी चालवण्याचा दंड बसला होता. पण मुळात त्याने दारू प्यायलेलीच नव्हती.

या व्यक्तीला एक आजार आहे. या व्यक्तीच्या पोटात आपोआप बीअर तयार होते. पाच वर्षांनी त्याला या आजाराबाबत माहीत मिळाली. या आजाराचं नाव आहे Auto-Brewery Syndrome(ABS).  या व्यक्तीच्या शरीरात एक फंगस डेव्हलप होतं. त्याचं नाव आहे Saccharomyces Cerevisiae. याने कार्बोहायड्रेट अल्कोहोलमध्ये रुपांतरित होतात. ज्यामुळे पोटात बीअर तयार होऊ लागते.

Richmond University Medical Center हे अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये आहे. येथील स्पेशलिस्ट डॉक्टरने या दुर्मिळ आजाराबाबत माहिती मिळवली. ही आजार इतका दुर्मिळ आहे की, गेल्या ३० वर्षात केवळ अशा ५ केसेस आढळल्या.

अ‍ॅंटी-बायोटिक्सने बिघडला खेळ

२०११ मध्ये या व्यक्तीने आपल्या एका जखमेसाठी अ‍ॅंटी-बायोटिक्स घेणे सुरू केले. त्यानंतर या दुर्मिळ आजाराने त्याला आपल्या जाळ्यात घेतलं. पोट आपोआपच बीअर तयार करू लागलंय. ब्रीथ एनालायजरमध्ये तो प्रत्येकवेळी तो दारू प्यायलेलाच आढळतो. यावर ना पोलिसांना विश्वास बसत ना त्याच्या घरच्यांना. अखेर २०१७ मध्ये या आजाराचा पर्दाफाश झाला. तेव्हा लोकांना विश्वास बसला. 


Web Title: This man stomach makes beer being arrested for drunk driving finds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.