अनेक लोकं डोक्यांवरील केसांसह दाढी आणि मिशीलाही डाय लावून काळी करतात. पण, 21 वर्षीय मार्नोला असं करणं खूपच महागात पडलं. त्याचा चेहऱ्याचा रंगच बदलला. मेट्रो वेबसाईच्या वृत्तानुसार मे महिन्याच्या एका दुपारी मार्नो बोथा आणि त्याची प्रेयसी कैटलीन व्हॅन हेके यांनी मस्तीत मार्नोची दाढी काळ्या रंगात रंगवण्याचा निर्णय घेतला. पण, त्यानंतर पुढे काय वाढून ठेवलंय, हे त्यांना कुठे माहीत होतं...
एअरटेल ग्राहक आहात, मग ही बातमी वाचा... लवकरच तुम्हाला 1GBसाठी मोजावे लागू शकतात 100 रुपये
मार्नोनं दाढी आणि मिशी वर डाय लावली. त्यानं बराच काळ ती डाय चेहऱ्यावर तशीच ठेवली, त्यानंतर कॅमिकल बर्न झालं आणि त्याला प्रचंड वेदना होऊ लागल्या. या एलर्जिक रिअॅक्शनमुळे जिथे डाय लावली होती तिथं त्याचा चेहरा वाईट पद्धतीनं लाल झाला. यानंतर त्याचे गाल, हनुवटी आणि ओठांना सूज आली. त्यासाठी त्याला पुढील महिनाभर औषध घ्यावी लागली.
दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या मार्नोनं सांगितले की,''मी दुपारी दाढीला डाय लावली. मी जेव्हा पहाटे 3 वाजता उठलो, तेव्हा माझ्या चेहऱ्यावर प्रचंड खाज सुटली होती. तेव्हा मी शेव्ह करण्याचा निर्णय घेतला. जेथे डाय लावली होती, तेथील भाग अधिक सूजला होता. त्यानंतर अन्य भागही सूजायला लागला.''
तो पुढे म्हणाला,''मला चेहराही हलवायला जमत नव्हता. खाजही खूप सुटली होती. त्यानंतर मी डॉक्टरकडे गेलो आणि त्यांनी मला कॅमिकल बर्न झाल्याचे सांगितले. मी बराच काळ डाय चेहऱ्यावर लावून ठेवली होती.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक : भारतीय खेळाडूनं केली पत्नी व आईची हत्या; मुलांना फोन करून सांगितली घटना
जेम्स अँडरसननं पाकिस्तानची जिरवली; तिसऱ्या कसोटीत भीमपराक्रमाची नोंद केली!
इंग्लंडकडून वस्त्रहरण; पावसानं वाचवली पाकिस्तानची इभ्रत!
जेम्स अँडरसनच्या विश्वविक्रमात भारतीय फलंदाजांचा 'मोठा' वाटा; जाणून घ्या कसा!
IPL 2020 : युवराज सिंगसाठी घेतला होता डिसिजन; रोहित शर्मा पुन्हा बदलणार 'पोझिशन'!
सुरेश रैना करणार समाजकार्य; जम्मू-काश्मीरमधील ग्रामीण भागातील मुलांसाठी काम करण्याची इच्छा
IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीच्या संघानं ठेवला आदर्श; दुबईत जपला 'स्वदेशी' मंत्र!