भारतात एखाद्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी 'देसी जुगाड' चा वापर केला जातो. कोणत्याही समस्येचे तात्काळ आणि तात्पुरतं समाधान मिळवणे म्हणजे देसी जुगाड. भारतातील लोक याच देसी जुगाडच्या माध्यमातून अनेक नवीन यंत्रे तयार करतात. या व्यतिरिक्त, अनेक वेळा महागड्या वस्तू स्वस्तात बनवण्यासाठीही देसी जुगाडचा वापर केला जातो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जुन्या कारला दिला नवा लुकसोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने मारुती 800 कारला मॉडिफाय करुन त्यात ट्रकचे टायर लावले आहेत. इतर देशांमध्ये मॉन्स्टर ट्रक असा एक गाडीचा प्रकार आहे. त्याच मॉन्स्टर ट्रकप्रमाणे ही कार दिसत आहे. या कारला विशेषतः वाळू असलेल्या परिसरात चालवण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. ही मॉडिफाय कार तयार करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर येताच लोकांना तो खूप आवडत आहे. अनेकांनी या देसी जुगाडचे कौतुक केलं आहे. व्हीव्हीआयपी कार्सने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. 700 हून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ थोडा जुना आहे, परंतु लोक आजही याला पसंत करत आहेत.