हरवलेली अनेक मुलं आपल्या आईवडीलांना पुन्हा मिळत नाहीत. कारण गुन्हेगारी विश्वात अशाच निरागस, निष्पाप मुलांना पळवून त्यांच्यावर अत्याचार केले जातात. असाच एक प्रकार समोर आला आहे. पण इथे मात्र एका रिक्षा चालकानं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आई-वडिलांना त्यांची ४ वर्षांची चिमुरडी परत मिळाली आहे. या माणसाचं नाव माजिद बेग आहे. बेंगलुरूच्या कोरमंगलामध्ये त्यानं एका ४ वर्षीय मुलाला रडताना पाहिले. या मुलीच्या हातात आईस्क्रिम होती आणि रडत रडत ती आपल्या आईला आवाज देत होती.
माजिदने सांगितले की, ''पहिल्यांदा मी कानडी भाषेत बोलायला सुरूवात केली. पण त्या मुलीला फक्त हिंदी कळत होतं. सगळ्यात आधी मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. मग येणाऱ्या जाणाऱ्या लोकांपैकी ती कोणाला ओळखते का? हे विचारण्याचा प्रयत्न केला. ती कोणालाच ओळखायला तयार नव्हती. त्यानंतर तीला मी पोलिस स्टेशनला घेऊन गेलो. '' विवेकनगर पोलिस स्टेशन जवळच होते. पोलिसांनी मग या मुलीच्या आई वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना या मुलीच्या वास्तव्याबद्दल काहीही माहिती नव्हती. त्यानंतर त्यांनी तिचा फोटो काढून शोधण्यास सुरूवात केली. रस्त्यावर अनाऊंसमेंट करायला केली.
काहीवेळातच या लहानमुलीचे आई वडिल पोलिस स्थानकात पोहोचले. तिचे आई वडिल उत्तरप्रदेशचे रहिवासी असून मजूरीचे काम करत होते. मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार,'' जेव्हा मी कचरा फेकण्यासाठी गेली तेव्हाच माझी मुलगी बेपत्ता झाली. मी रिक्षावाले दादा आणि पोलिसांचे खूप आभार मानेन. त्यांच्या प्रयत्नांमुळे मला मुलगी परत मिळाली.'' बाबो! नवऱ्याला कुत्र्याचा पट्टा घालून बायको फिरवत होती; पोलिसांनी वसूल केले २ लाख
रिक्षाचालकाला माजिदनं सांगितले की, ''आई वडिलांपासून मुलं दुरावण्याचे दुःख मी समजू शकतो. कारण मी स्वतः दोन मुलींचा बाप आहे. रस्त्यावर या लहान मुलीला रडताना पाहून मला खूप वाईट वाटलं त्यानंतर मी पोलिसांची मदत घेतली. '' पोलिस स्थानकात आपल्या मुलीला पाहिल्यानंतर आईला अश्रू अनावर झाले होते. अरेरे! बर्डफ्लूमुळे कोंबड्यांना घेऊन जाताना पाहिलं; अन् तो ढसाढसा रडला, पाहा व्हिडीओ