(Image Credit : Social Media)
जग हे अनेक रहस्यमय गोष्टींचं भांडार आहे. काही रहस्य उलगडण्यात मनुष्यांना यश मिळालं असलं तरी काही रहस्य आजही असे आहेत, जे उलगडण्यात मनुष्यांना यश मिळालेलं नाही. हे रहस्य उलगडणं जवळपास अशक्य आहेत. एक असंच रहस्य आहे. ते म्हणजे एक २४० पानांचं पुस्तक. हे पुस्तक आजपर्यंत कुणीही वाचू शकलं नाही, असं बोललं जातं.
(Image Credit : Social Media)
इतिहासकारांनुसार, हे रहस्यमय पुस्तक ६०० वर्ष जुनं आहे. कार्बन डेटिंगच्या माध्यमातून कळाले की, हे पुस्तक १५व्या शतकात लिहिलं गेलं आहे. तसेच हे पुस्तक हाताने लिहिलं गेलं आहे. पण यात नेमकं काय लिहिलंय आणि कोणत्या भाषेत लिहिलंय हे मात्र आजपर्यंत कुणाला समजू शकलेलं नाही.
(Image Credit : Social Media)
हे पुस्तक आजही एखाद्या न सोडवता येणाऱ्या कोड्यासारखं आहे. या पुस्तकाला 'वॉयनिक मॅन्युस्क्रिप्ट' असं नाव देण्यात आलंय. तसेच या पुस्तकात मनुष्यांसोबतच अनेक झाडांचेही चित्र काढण्यात आले आहेत. पण आश्चर्याची बाब म्हणजे या पुस्तकात अशाही काही झाडांचे चित्र आहेत, जे पृथ्वीवर असलेल्या कोणत्या झाडांशी मिळते-जुळते नाहीत.
(Image Credit : Social Media)
या पुस्तकाचं नाव 'वॉयनिक मॅन्युस्क्रिप्ट' हे इटलीच्या एका बुक डिलर विलफ्रीड वॉयनिक यांच्या नावावरून ठेवण्यात आलंय. असे मानले जाते की, त्यांनी हे रहस्यमय पुस्तक १९१२ मध्ये कुठूनतरी खरेदी केलं होतं.
(Image Credit : Social Media)
असे सांगितले जाते की, या पुस्तकाला अनेक पाने होती. पण काळानुसार याची अनेक पाने खराब झालीत. सध्या या पुस्तकाची केवळ २४० पाने शिल्लक आहेत. या पुस्तकात काय लिहिलंय याबाबत काही खास माहिती समोर आली नाही. पण यातील काही शब्द लॅटीन आणि जर्मन भाषेत असल्याचं समजलं.
(Image Credit : Social Media)
अनेक लोकांचं असं मत आहे की, एखादं किंवा अनेक रहस्य लपवण्यासाठी हे पुस्तक असं लिहिण्यात आलं असावं. आता ते रहस्य काय आहे हे तर पुस्तक लिहिणाऱ्या लेखकालाच माहीत असेल. कदाचित येणाऱ्या काळात हे पुस्तक कुणी वाचूही शकेल.