प्रत्येक देशातील लोकांमध्ये करन्सी छापणे हा एक कुतूहलाचा विषय असतो. आजकाल जास्तीत जास्त देश आपली करन्सी स्वत:च छापतात. पण आजही असे बरेच छोटे देश आहेत जे करन्सी छापण्यासाठी दुसऱ्या देशातील कंपन्यांची मदत घेतात. तुम्हाला वाचून आश्चर्य होईल की, चीनमधील एक कंपनी जगात करन्सी छापण्याबाबत खूप फेमस झाली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, कही कंपनी चीनची सरकारी कंपनी आहे. पण करन्सी छापण्यासाठी या कंपनीचा सेटअप इतका वाढला आहे की, देशातील अनेक देश यांच्याकडून नोटा छापून घेतात आणि नाणीही बनवून घेतात. तसेच नोटा छापण्यासाठी लागणारा कागद, शाई ही कंपनी स्वत: बनवते. यांचा प्रिंटिंग सेटअप चीनच्या अनेक शहरांमध्ये आहे.
या कंपनीचं नाव आहे चायना बॅंकनोट प्रिंटिंग अॅंड मिंटिंग कॉर्पोरेशन म्हणजे सीबीपीए. या कंपनीकडे नोटा छापण्यासाठी आणि त्यासंबंधी वस्तू तयार करण्यासाठी 10 मोठे कारखाने आहेत. यात जवळपास 18 हजार लोक काम करतात. चीनचा दावा आहे की, ही जगातील सगळ्यात सुरक्षित नोट छापणारी कंपनी आहे. इथे विना परवानगी एकही नोट बाहेर जात नाही.
असं मानलं जातं की, चीनचा हा सेटअप ब्रिटन आणि अमेरिकेच्या तुलनेत खूप मोठा सेटअप आहे. कारण यूएस ब्यूरो ऑफ एनग्रेविंग अॅंड प्रिंटिंगमध्ये 2,000 पेक्षा कमी कर्मचारी काम करतात. तर ब्रिटनच्या डी ला रू मध्ये 3 हजारांपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. तेच भारताचा नोटा छापण्याचा प्रिंटिंग सेटअपही मोठा आहे. पण इतके कर्मचारी नाहीत. तसेच जर्मनीच्या गिसेके आणि डेवरिएंटकडेही इतके कर्मचारी नाही.
चीनच्या कंपनीची सुरूवात 1984 मध्ये चीनच्या मुद्रा छापण्यापासून झाली होती. पण हळूहळू कंपनीने मोठा उद्योग सुरू केला. असं म्हटलं जातं की, जेव्हा चीनमध्ये डिजिटल देवाण-घेवाण सुरू झाली तेव्हा कमी कागदाच्या युआन नोटा छापल्या जात होत्या. त्यानंतर चीनने बाहेरील देशांच्या नोटा छापण्याचे आर्डर घेणे सुरू केले. आज जगातील अनेक देश या कंपनीकडून नोटा छापून घेतात. ज्यात भारताजवळील अनेक देशांचा समावेश आहे.