जवानांच्या शौर्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर एका जवानाचा फोटो व्हायरल होत आहे. आंध्रप्रदेशातील तिरूमालामध्ये हिंदू-मुस्लिम समानतेचे दर्शन घडवणारं उदाहरण दिसून आलं आहे. या मुस्लिम जवानानं हिंदू महिलेला आपल्या पाठीवर बसवून ६ किलोमीटरचा रस्ता पार केला आहे. या महिलेला तिरूमाला मंदिरात भगवान वेंकटेश्वराची पुजा करण्यासाठी येता यावं यासाठी जवानाने मदतीचा हात दिला आहे.
५८ वर्षीय महिला मंगी नागेश्वरम्ना तिरूमाला मंदिराच्या दोन दिवसीय धार्मिक यात्रेसाठी निघाली होती. ही पदयात्रा असल्यामुळे रस्त्यात या महिलेची तब्येत खराब झाली. त्यांच्याकडून चाललं सुद्धा जात नव्हतं. पर्वतांवर असलेले तिरूमाला मंदिर फक्त ६ किलोमीटर दूर अंतरावर होते. मंगी नागेश्वरम्मा नंदलूर मंड ते तिरूमाला मंदिरासाठी पायी निघाल्या होत्या. २२ डिसेंबरला दुपारी त्यांना यात्रेदरम्यान उच्च रक्तदाबाच्या समस्येचा सामना करावा लागला. याला म्हणतात इच्छाशक्ती! ६२ वर्षांच्या आजी २३० किमी ड्रायविंग करत सिंघू बॉर्डरवर पोहचल्या
यादरम्यान कडप्पा जिल्ह्यातील पोलिस जवान या तीर्थयात्रेच्या बंदोबस्तासाठी उपस्थित होते. तेव्हा कॉन्स्टेबल शेख अरशद यांचे लक्ष नागेश्वरम्मा यांच्याकडे गेलं. कॉन्सटेबल शेख अरशद सगळ्यात आधी नागेश्वरम्मा यांना रुग्णालयात घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी ६ किलोमीटरपर्यंत आपल्या पाठीवर बसवून त्यांना मंदिरापर्यंत नेलं. यादरम्यान इतर कॉन्स्टेबलसुद्धा वयस्कर माणसांना आपल्या खाद्यावर उचलून मंदिरापर्यंत पोहोचवत होते. शाब्बास! पुण्याच्या २ शाळकरी पोरींनी केली कमाल; मंगळ आणि गुरूच्यामध्ये शोधले ६ लहान ग्रह
कॉन्सटेबल शेख अरशद यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. त्याचे वरिष्ठ आणि तिरूमाला मंदिरात येणारे भाविकसुद्धा या जवानाच्या कामाने प्रभावित होऊन कौतुक करत आहेत. त्यांची ही कामगिरी संपूर्ण आंध्र प्रदेशात चर्चेचा विषय बनली आहे.