उत्तर प्रदेशच्या मुझ्झफरनगरमद्ये पोलीस स्क्वाडच्या एक मादा डॉगीचा सन्मान करण्यासाठी तिचा पुतळा उभारला. या डॉगीचं नाव होतं टिंकी. या डॉगीने आपल्या हुंकण्याच्या जबरदस्त शक्तीच्या माध्यमातून ४९ गुन्हेगारी केसेस सॉल्व करण्यात मदत केली होती. आता या डॉगीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आणि या डॉगीचं लोक भरभरून कौतुक करत आहे. रिपोर्टनुसार, आठ वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या या डॉगीचं गेल्यावर्षी नोव्हेंबरला निधन झालं होतं. ही डॉगी ६ वर्षे एएसपी क्यूटिक्स म्हणून काम करत होती.
६ जानेवारीला आयपीएस अभिषेक यादव यांनी टिंकीचे दोन फोटो शेअर केले आणि लिहिले की ASP टिंकी जिने मुजफ्फरपूर पोलिसात कार्यरत असताना ४९ केसेसचा खुलासा केला होता. तिने २०२० मध्ये आमची साथ सोडली. आज तिच्या कार्यासाठी आणि योगदानासाठी एक आठवण म्हणून श्वान कक्षात तिची प्रतिमा उभारण्यात आली. पोस्टला आतापर्यंत ५ हजारांपेक्षा जास्त लाइक्स आणि ७०० पेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत. (हे पण वाचा : खरंच? २३ लाखांना विकला जातोय साधारण दिसरणारा हा कुत्रा; कारण वाचून व्हाल अवाक्)
टिंकीच्या निधनानंतर पोलीस लाइनमध्ये पूर्ण सन्मानासोबत तिच्यावर अंत्यविधी करण्यात आला. आणि आता तिच्या सन्मानार्थ आणि आठवणीत तिची प्रतिमा उभारण्यात आली आहे. दरम्यान २०१३ मध्ये ग्वालियर स्थित बीएसफ अकॅडमीचे नॅशनल डॉग ट्रेनिंग सेंटरमधून प्रशिक्षण घेतल्यानंतर २०१४ मध्ये टिंकीला डॉग स्क्वाडमध्ये हेड कॉंस्टेबल म्हणून सामिल करून घेतलं होतं. आपल्या जबरदस्त कामामुळे टिंकी एएसपी पदावर पोहोचली होती आणि डॉग स्क्वाडचाही सन्मान वाढला.