इजिप्त एक प्राचीन देश असून येथील ऐतिहासिक गोष्टींनी नेहमीच जगाचे लक्ष वेधले आहे. अजूनही इथे सतत शोध सुरू असून लोकांचीही नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. आता येथील समुद्रात काही अशा वस्तू मिळाल्या आहेत की, संशोधकांसोबतच लोकही हैराण झाले आहेत. इथे समुद्राच्या खोलवर एक रहस्यमय मंदिर सापडलं आहे, जे साधारण १२०० वर्ष जुनं आहे. त्यासोबतच इथे खजिन्याने लादलेली एक नौकाही मिळाली आहे.
हे मंदिर हेराक्लिओन शहराच्या उत्तरेला आढळलं, ज्याला इजिप्तचं हरवलेलं शहर अटलांटिस म्हटलं जातं. याचा शोध लावणाऱ्या पुरातत्ववाद्यांनुसार, प्राचीन काळात हेराक्लिओनला मंदिरांचं शहर म्हटलं जात होतं. पण साधारण हजार वर्षांपूर्वी आलेल्या त्सुनामीमुळे हे शहर समुद्रात बुडालं होतं.
(Image Credit : www.thesun.co.uk)
पुरातत्व खात्यानुसार, मंदिरासोबत इथे समुद्रात एक नौकाही मिळाली आहे. ज्यात तांब्याची नाणी आणि काही दागिने आहेत. ही नाणी राजा टॉलमी द्वितीयच्या कार्यकाळातील आहेत.
समुद्राच्या आता अनेक प्राचीन इमारती आणि मातीची भांडीही मिळाली आहेत. या वस्तू साधारण २ हजार वर्ष जुन्या असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या १५ वर्षात इथे समुद्रातून ६४ प्राचीन नौका, सोन्याच्या नाण्यांचा खजिना, १६ फूट उंच मूर्ती आणि विशाल मंदिरांचे अवशेष मिळाले आहेत.