बिहारच्या गयामध्ये एका डॉक्टरबाबतची फारच हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथील डॉक्टरवर आरोप आहे की, ऑपरेशन दरम्यान २१ वर्षीय महिलेच्या पोटात त्याने टॉवेल तसाच सोडला. मीरा देवी नावाच्या महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्यावर तिला खिजरसराय परिसरातील एका खाजगी दवाखान्यात भरती केलं होतं.
२९ जुलैला डॉक्टरने महिलेचं ऑपरेशन केलं होतं. पण त्यानंतर वेदना कमी न झाल्याने महिलेचा त्रास वाढतच गेला. ऑपरेशननंतर तिला सतत वेदना होत त्या आणि जखमेतून पस निघत होता. याने चिंतेत असलेल्या कुटुंबिय तिला पटण्याला घेऊन गेले. पण तिचा त्रास काही कमी झाला नाही.
नंतर त्यांनी महिलेला दुसऱ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती केलं. जिथे डॉक्टरांनी तिला सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. सीटी स्कॅनचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण झाले. कारण महिलेच्या पोटात एका भागात काहीतरी वस्तू त्यांना दिसत होती. डॉक्टरांनी पुन्हा ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्यांनी ऑपरेशन केल तेव्हा महिलेच्या पोटात त्यांना एक टॉवेल सापडला. या टॉवेलचा वापर ऑपरेशन दरम्यान डॉक्टर करतात.
महिलेल्या परिवारातील मोहन कुमारने सांगितले की, त्याच्या भावाच्या पत्नीची ही पहिली डिलेव्हरी होती. त्यामुळे गया शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये तिला भरती करण्यात आले होते. २९ जुलैला डॉक्टरांनी ऑपरेशन केलं होतं. पण त्यानंतर महिलेच्या पोटात सतत वेदना होत होत्या.
आता डॉक्टरांनुसार महिलेची हालत नाजूक आहे आणि सतत रक्त देण्याची गरज पडत आहे. तेच महिलेचे नातेवाईक तिच्या पोटात टॉवेल विसरणाऱ्या डॉक्टर विरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.
हे पण वाचा :
गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून दाढी, मिशी काळी करत असाल तर सावधान! आधी हे वाचा
सलाम! कधीही विसरणार नाही रात्रंदिवस राबणाऱ्या कोरोनायोद्ध्याचं बलिदान; मन हेलावून टाकणारा फोटो
कोरोना झालेल्या व्यक्तीचं हॉस्पिटलमध्येच लावून दिलं लग्न, व्हिडीओ व्हायरल