झोपताना डोक्याजवळ मोबाइल चार्जिंगला लावता का? मग हा व्हिडीओ बघाच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 04:50 PM2023-08-04T16:50:40+5:302023-08-04T16:52:34+5:30
आजच्या काळात स्मार्टफोन सगळ्यांच्या जीवनातील महत्वाचा भाग झाला आहे. लोक सतत आपल्या हातात फोन घेऊन बिझी असतात. मोबाइल फोन खरेदी करताना लोक त्याची बॅटरी लाइफही चेक करतात.
मनुष्याने आपल्या सुविधेसाठी अनेक गोष्टींचा शोध लावला. एकमेकांनासोबत संपर्कात राहण्यासाठी लोकांनी फोनचा आविष्कार केला. आधी मोबाइल मग नंतर व्हिडीओ कॉलही आले. हे सगळं स्मार्ट फोन आणि इंटरनेट कनेक्शनमुळे झालं.
आजच्या काळात स्मार्टफोन सगळ्यांच्या जीवनातील महत्वाचा भाग झाला आहे. लोक सतत आपल्या हातात फोन घेऊन बिझी असतात. मोबाइल फोन खरेदी करताना लोक त्याची बॅटरी लाइफही चेक करतात. ज्या फोनची बॅटरी जास्त काळ चालते असेच फोन खरेदी केले जातात. दिवसभर मोबाइल वापरल्यानंतर लोक रात्री तो चार्जिंगला लावतात. जास्तीत जास्त लोक झोपताना डोक्याजवळ मोबाइल चार्जिंगला लावतात. पण हे फार घातक ठरू शकतं.
प्रयोगातून समोर आलं धक्कादायक सत्य
सोशल मीडियावर एका तरूणीच्या माध्यमातून डोक्याजवळ मोबाइल चार्ज करण्याचा परिणाम दाखवण्यात आला. या व्हिडिओत एका तरूणीला बेडवर झोपवण्यात आलं. त्यानंतर तिच्या डोक्याजवळ मोबाइल फोन चार्ज करण्यासाठी लावण्यात आला. तरूणीच्या शरीराची हालचाल मॉनिटर करण्यासाठी हातांवर मशीन लावण्यात आली. जी तिच्या शरीराच्या रिअॅक्शन रेकॉर्ड करत होती. जेव्हा तरूणीच्या डोक्याजवळ ठेवलेल्या मोबाइलचं चार्जर ऑन केलं तेव्हा समजलं की, कशाप्रकारे मनुष्याचं शरीर या चार्जिंग रेडिएशनने प्रभावित होतं.
जेव्हा मोबाइल चार्ज केला जातो तेव्हा यातून रेडिओ वेव्ह निघतात. जे आपल्या शरीराला खूप डॅमेज करू शकतात. ब्लड प्रेशरसोबतच अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हेच कारण आहे की, जेव्हा आपण विमानातून प्रवास करत असतो तेव्हा मोबाइल फ्लाइड मोडवर ठेवण्यास सांगितलं जातं. मोबाइल फोनचे रेडिएशन विमानाच्या फ्रीक्वेंसीला डिस्टर्ब करू शकतात.
सोशल मीडियावर लोकांना अवेअर करण्यासाठी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक नक्कीच कधीच त्यांच्या डोक्यावर मोबाइल फोन चार्ज करणार नाही.