जर तुम्हाला हिऱ्याची आवड असेल तर नॅशनल म्यूझिअममध्ये तुम्ही येऊन वेगवेगळे हिरे बघू शकता. इथे ११ वर्षांनी १८ फेब्रुवारीपासून हैद्राबादच्या निजामाच्या शाही खजान्याचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, यात तुम्ही १७३ किंमती रत्न आणि दागिन्यांचा समावेश आहे. यात खास आहे जॅकब डायमंड, हा डायमंड आकाराने कोहिनूर हिऱ्यापेक्षाही मोठा आहे.
किती आहे डायमंडची किंमत?
रिपोर्टनुसार, १८५ कॅरेटच्या जॅकब डायमंडची किंमत सद्या ४०० कोटी असल्याचे सांगितले जाते. हा हिरा हैद्राबादचे सहावे निजाम महबूब अली खान यांनी शिमल्यातील एका हिरे व्याराऱ्याकडून २३ लाख रूपयांना खरेदी केला होता.
१९९५ मध्ये भारत सरकारने केला खरेदी
हैद्राबाद सरकारने निजामांचे दागिने भारत सरकारने १९९५ मध्ये २१५ कोटी रूपयांमध्ये खरेदी केले होते. पण सध्या हे दागिने सुरक्षेसाठी एचइएच निजाम ज्वेलरी ट्रस्ट आणि एचइएच निजाम सप्लीमेंट ज्वेलरी ट्रस्टकडे आहेत. एका रिपोर्टनुसार, या खजिन्याची किंमत ५० हजार कोटींपेक्षाही जास्त आहे.
काय काय बघायला मिळेल?
या प्रदर्शनीमध्ये २८ शोकेसमध्ये हे किंमती दागिणे ठेवण्यात आले आहेत. यात सरपेच, नेकलेस, कमरपट्टा, ब्रेसलेट, बांगड्या असे वेगवेगळी दागिने ठेवण्यात आले आहेत.