एक ट्विट आणि 45 वर्षांचा तुरुंगवास; महिलेनं ट्विटमध्ये नेमकं काय लिहिलं..?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 06:40 PM2022-08-30T18:40:22+5:302022-08-30T18:40:34+5:30

याआधी एका महिलेला कार चालवल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

One tweet and 45 years in prison; What exactly did the woman write in the tweet? | एक ट्विट आणि 45 वर्षांचा तुरुंगवास; महिलेनं ट्विटमध्ये नेमकं काय लिहिलं..?

एक ट्विट आणि 45 वर्षांचा तुरुंगवास; महिलेनं ट्विटमध्ये नेमकं काय लिहिलं..?

Next


फ्रीडम ऑफ स्पीचवर जगभर चर्चा होत असते. विशेषतः सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा असते. पण या सगळ्यात फक्त एका ट्विटसाठी कुणाला 45 वर्षांची शिक्षा झाली तर? सौदी अरेबियाच्या न्यायालयाने एका महिलेला सोशल मीडियावर आपले विचार लिहिल्याबद्दल ही कठोर शिक्षा सुनावली आहे. सौदी अरेबियाच्या सामाजिक बांधणीला कलंकित करण्यासाठी इंटरनेटचा वापर केल्याचा आरोप नौरा बिन सईद अल-काहतानी नावाच्या महिलेवर आहे.

नौरा बिन सईद यांना फक्त आपले विचार मांडल्याबद्दल अनेक दशकांची शिक्षा झाली. त्यांनी सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. डेमोक्रेसी फॉर द अरब वर्ल्ड नाऊ  (Dawn) या मानवाधिकार संघटनेने न्यायालयाचा हा आदेश पाहिल्याचा दावा केला आहे. ही संघटना जमाल खशोग्गी यांनी स्थापन केली होती. दरम्यान, सौदी अरेबियाच्या काळ्या कायद्यामुळे तुरुंगात दिवस काढावे लागलेली नौरा ही पहिली महिला नाही. याआधीही अनेक महिलांना हक्कासाठी आवाज उठवण्याची ही शिक्षा मिळाली आहे. 

नौरा नावाच्या या महिलेला कधी अटक झाली, त्यावेळी काय परिस्थिती होती आणि तिला शिक्षा कधी झाली, याबद्दल फारशी माहिती मिळू शकलेली नाही. ट्विटरवर आपले मत मांडल्यामुळे तिला ही शिक्षा देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. काही आठवड्यांपूर्वी, लीड्स विद्यापीठातील पीएचडीची विद्यार्थिनी आणि दोन मुलांची आई असलेल्या 34 वर्षीय सलमा अल शबाबला 34 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 

ड्रायव्हिंगमुळे तुरुंगवास
सौदीतील एक सामाजिक कार्यकर्ती लौजेन अल-हथलौल हिला फक्त कार चालवली म्हणून अटक करण्यात आले होते. त्यांना मे, 2018 मध्ये तुरुंगवास झाला होता आणि गेल्यावर्षी जामीन मिळाला. पण, सध्या त्यांच्यावर पाच वर्षांचा ट्रॅव्हल बॅन आणि इतर निर्बंध लावण्यात आले आहेत.

Web Title: One tweet and 45 years in prison; What exactly did the woman write in the tweet?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.