पेंटिंग आणि ड्रॉइंग करणारी रोबोट आयडा, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये भरणार पेंटिंग्सचं प्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 03:10 PM2019-06-04T15:10:16+5:302019-06-04T15:17:38+5:30
वेगवेगळ्या कामांसाठी आता रोबोट तयार केले जात आहेत. वैज्ञानिकांनी असाच एक अनोखा रोबोट तयार केला आहे.
सध्याचं विश्व हे रोबोटचं आहे. वेगवेगळ्या कामांसाठी आता रोबोट तयार केले जात आहेत. वैज्ञानिकांनी असाच एक अनोखा रोबोट तयार केला आहे. हा रोबोट पेंटिंग आणि ड्रॉइंग करण्यात सक्षम आहे. या रोबोटला आयडा (Ai-Da) असं नाव देण्यात आलं आहे. तर रोबोटला महिलेचा चेहरा देण्यात आला आहे. आयडा रोबोट तिच्या हातांनी आणि डोळ्यांनी पेंटिंग करते. या रोबोटचं नाव गणितज्ञ एडा लवलेसच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे.
पेंटिंग्सचं प्रदर्शन भरवणार
आयडाकडून तयार करण्यात आलेल्या पेंटिंग्स प्रदर्शन ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये भरवलं जाणार आहे. याची सुरूवात १२ जूनला होणार असून या प्रदर्शनीमध्ये पेंटिंग, ड्रॉइंग, स्कल्पचर आणि व्हिडीओ आर्टचा समावेश असणार आहे. आयडा आर्टवर्क तयार करण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि अल्गोरिदमचा वापर करते.
हा रोबोट तयार करणारे एडन मेलर सांगतात की, ही रोबोटिक आर्ट आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची सुरूवात आहे. आनंद होतोय की, आम्ही पहिला कागदाला आकार देणारा आणि त्यात रंग भरणारा प्रोफेशनल मानव रोबोट आर्टिस्ट सादर करत आहोत.
हातांवर घ्यावी लागली जास्त मेहनत
या रोबोट हात इंग्लंडच्या इंजिनिअर्सने तयार केलेत. वैज्ञानिक लूसी सीलनुसार, याची कलात्मक क्षमता लक्षात ठेवून खास प्रकारची प्रोग्रामिंग केली गेली. आशा आहे की, या रोबोटचं काम पसंत केलं जाईल. तसेच लोकांना यातून प्रेरणा मिळेल.