तसं तर कोणत्याही गोष्टीची नशा करणं चुकीचच आहे. लोक नशेसाठी वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतात. काही दिवसांआधीचं समोर आलं होतं की, लोक सापाच्या विषाचाही नशेसाठी वापर करतात. आता एका देशातून असं समोर आलं आहे की, येथील लोक नशेसाठी कबरेतून लोकांचे सांगाडे बाहेर काढत आहेत. स्थिती इतकी वाईट झाली आहे की, या देशाच्या सरकारला इमर्जन्सी लागू करावी लागली आहे. आफ्रिकेच्या पश्चिम भागातील सियेरा लियोन देशातील ही घटना आहे.
सिएरा लियोनमध्ये मानवी हाडांपासून तयार होणारं सायकोएक्टिव ड्रग डोकेदुखी ठरत आहे. नशा करण्यासाठी लोक करबेतून मृत लोकांचे सांगाडे बाहेर काढत आहेत. बीबीसीनुसार, या देशात ही स्थिती इतकी गंभीर झाली आहे की, सरकारला इमरजन्सी लागू करावी लागली.
वेगवेगळ्या शहरांमध्ये कबरींमधून हाडे चोरी केली जात असल्याने पोलिसांना पाळत ठेवावी लागत आहे. झोंबी ड्रग किंवा कुश म्हटलं जाणारं हे ड्रग वेगवेगळ्या प्रकारच्या टॉक्सिक सब्सटेंसपासून तयार होतं, ज्यातील एक भाग म्हणजे मानवी हाडे आहेत.हे ड्रग जवळपास सहा वर्षाआधी पश्चिम आफ्रिकन देशात समोर आलं होतं.
आउटलेटनुसार, ही एक अशी नशा आहे जी अनेक तास राहते. त्यामुळे ही एक मोठी समस्या बनत आहे. याचे डीलर कथितपणे दरोडेखोर बनले आहेत. जे कबरींमधून मानवी हाडे चोरी करतात.
या देशात या ड्रगमुळे मृत्यूदर वाढला आहे. सरकारकडून सांगण्यात आलं की, त्यांनी हे ड्रग नष्ट करण्यासाठी एक टास्क फोर्स तयार केली आहे. म्हणजे वेगवेगळ्या शहरांमध्ये असे केंद्र असतील ज्यात नशेच्या सवयीने पीडित लोकांची काळजी घेतली जाईल.