मंगळ ग्रहावर अडीच लाख लोक कसे राहतील आणि कशी असतील घरे? डिझाइन स्टुडिओने शेअर केला प्लॅन!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 09:37 AM2021-03-22T09:37:01+5:302021-03-22T09:39:04+5:30
कंपनीने सांगितले की, मंगळावर व्हर्टिकल रूपात घरे असतील जेणेकरून वायुमंडळाच्या दबावापासून आणि रेडिएशनपासून बचाव होईल.
लाल ग्रह म्हणजे मंगळ ग्रहावर घर कसे तयार केले जातील आणि अडीच लाख लोक तिथे कसे राहतील? याचं एक डिझाइन अमेरिकन आर्किटेक्टर स्टुडिओ ABIBOO ने तयार केलं आहे. या कंपनीने सांगितले की, मार्स म्हणजेच मंगळ ग्रहावरील कार्बन डाय ऑक्साइड आणि पाण्याच्या वापराने तिथे घरे तयार केली जाऊ शकतात. कंपनीने सांगितले की, मंगळावर व्हर्टिकल रूपात घरे असतील जेणेकरून वायुमंडळाच्या दबावापासून आणि रेडिएशनपासून बचाव होईल.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, सध्याच्या योजनेनुसार, मंगळ ग्रहावर २०५४ च्या आधी कन्स्ट्रक्शन सुरू होणं शक्य नाही. तर २१०० नंतरच लोक मंगळ ग्रहावर राहणं सुरू करू शकतील. मंगळ ग्रहावर सस्टेनेबल शहर वसवण्यासाठी वेगवेगळे एक्सपर्ट अनेक वर्षांपासून काम करत आहेत.
ABIBOO च्या डिझाइनमध्ये दाखवण्यात आले आहे की, नुवा मार्सचं मुख्य शहर असेल. इथे अडीच लाख लोक राहू शकतात. हे शहर डोंगरांच्या किनाऱ्यांवर वसवलं जाणार. कंपनीने मंगळ ग्रहावरीलच संसाधनांपासून स्टील तयार करण्याची योजना केली आहे. ज्याच्या माध्यमातून मजबूत घर तयार केले जातील.
पृथ्वीवर असलेल्या सध्याच्या कोणत्याही घरांप्रमाणे मंगळ ग्रहावरही घर, ऑफिस आणि ग्नीन स्पेस असेल. ABIBOO म्हणाले की, द मार्स सोसायटी आणि SONet नेटवर्ककडून करण्यात आलेल्या रिसर्चच्या आधारावर हे डिझाइन तयार करण्यात आलं आहे.