Jara hatke: अवघ्या १३ फुटांच्या घराची किंमत ५ कोटी, तरीही खरेदीसाठी लोकांची गर्दी, अशी आहे खासियत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 04:58 PM2021-09-19T16:58:15+5:302021-09-19T17:00:14+5:30
Jara hatke News: ब्रिटनमधील किंग्स्टन अँड चेल्सियामधील एका प्रॉपर्टीची किंमत भारतीय चलनामधील ५ कोटी रुपये एवढी लावण्यात आली आहे.
लंडन - कुठलेही घर खरेदी करण्यासाठी सर्वात आधी त्याची लांबी-रुंदी, इंटिरियर आणि लोकेशन पाहिले जाते. मात्र ब्रिटनमधील किंग्स्टन अँड चेल्सियामधील एका प्रॉपर्टीची किंमत भारतीय चलनामधील ५ कोटी रुपये एवढी लावण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा फ्लॅट केवळ १३ फुटांचा आहे. तरीही त्यांची किंमत दिवसेंदिवस वधारत आहे.
ही प्रॉपर्टी खूप सुंदर आहे. मात्र त्याची लांबी केवळ १३ फूट आहे. बाहेरून हे घर जेवढं अरुंद दिसतं तेवढाच सुंदर या घराचा आतील इंटिरियर आहे. या घराचा सर्वात लांब भाग हा समोरून मागच्या बाजूला १३ फुटांचा आहे. Purple Bricks कडून विकल्या जाणाऱ्या या फ्लॅटमध्ये स्टोरेजचीसुद्धा उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
हे घर कुठल्याही फिल्मी प्रॉपप्रमाणे भासते. घराबाहेर अजिबात स्पेस नाही आहे. मात्र आत गेल्यावर पांढऱ्या भिंती आणि मोठमोठ्या खिडक्या लक्ष वेधून घेतात. तसेच या घरात कॉरिडॉरही उपलब्ध आहे. या फ्लॅटमध्ये दोन डबलबेड रूम आहेत. तसेच एक मोठा लिव्हिंग रूम आहे. तसेच एक शॉवर रूमही उपलब्ध आहे. आश्चर्याची बाब म्हणजे. या एवढी कमी जागा असलेल्या घरात एक छोटा बगिचाही तयार करण्यात आला आहे. छोटं घर असूनही सुंदर दिसावं यासाठी हे घर अगदी स्मार्टपणे डिझाईन करण्यात आले आहे.
हे घर थर्लो स्क्वेअरमध्ये बांधण्यात आले आहे. येथून जवळच साऊथ केनिंसिंग्टन ट्यूब स्टेशन आहे. तर त्याच्या अगदी समोर एक सुंदर पार्क आहे. त्यामुळे अगदी कमी जागा असूनही या कमी जागेच्या घराच्या खरेदीसाठी लोक अधिकाधिक उत्सुकता दाखवत आहेत. या घराच्या एका बाजूला डॉक्टरांचे सर्जरी क्लिनिक आहे. तर दुसरीकडे हेअरड्रेसिंग सलून आहे. ५ फ्लोअरच्या या घराचे एकूण क्षेत्रफळ १०३४ स्क्वेअर मीटर आहे. इंग्लंडमध्ये याआधीही एक १.६६ मीटरचे घर ६ कोटींहून अधिक रकमेला विकले गेले होते.