नवी दिल्ली - आजकाल अनेक लोक ऑनलाईन पैसे कमवत आहेत. यूट्युबपासून इंन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून लोक पैसे कमवत आहेत. काही अन्य वेबसाईट्ससुद्धा आहेत. त्या लोकांना घरबसल्या पैसे कमावण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत. यामध्ये परदेशामध्ये ओन्लीफॅन्स नावाची साईट खूप लोकप्रिय आहे. या साईटवर अॅडल्ट कन्टेन्ट खूप शेअर केला जातो. तो पाहण्यासाठी लोक पैसेही मोजतात. हल्लीच अँड जेना नावाच्या एका महिलेने सांगितले की, या साईटच्या माध्यमातून तिने एक वर्षामध्ये सात कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यासाठी तिने एक युनिक कंटेंट लोकांना उपलब्ध करून दिला.
अँड जेना हिला लोक पपी गर्ल जेना (Puppy Girl Jenna) या नावानेही ओळखतात. जेना हिने सांगितले की, ती कुत्र्यांप्रमाणे अभिनय करून खूप पैसे कमवत आहे. तिला लोक आपल्या सेक्सुअर डिस्चार्जसाठी कुत्र्यांप्रमाणे अभिनय करायला सांगतात. त्याबदल्यात तिला बऱ्यापैकी रक्कम फी म्हणून दिली जाते. जेना हिने नो जंपर नावाच्या यूट्युब चॅनेलच्या होस्टला हल्लीच दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, लोक तिला कुत्र्यासारखे वागण्यासाठी, चार पायांवर चालण्यासाठी आणि भुंकण्याच्या बदल्यात पैसे देतात. असे करताना ती व्हिडीओ बनवते. त्यानंतर ते व्हिडीओ ऑनलाईन शेअर करते.
जेना हिने लॉकडाऊनदरम्यान, विरंगुळा म्हणून ओन्लीफॅन्सवर अकाऊंट तयार केले होते. तिने त्यावर मस्ती करण्यासाठी व्हिडीओ टाकायला सुरुवात केली. सुरुवातीला तिने व्हॅनिला आईसक्रीमसह व्हिडीओ टाकले. मात्र एकदा तिने बदल म्हणून कुत्र्यासारखी पोझ देऊन व्हिडीओ टाकला. हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला. त्यानंतर तिच्याकडे अशा व्हिडीओसाठी मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली. जेनाने सांगितले की, गेल्या वर्षी जून महिन्यापासून तिने यावर प्रोफेशनली व्हिडीओ टाकण्यास सुरुवात केली. तसेच एक वर्षामध्ये तिने यामधून सात कोटींची कमाई केली आहे.
ओन्लीफॅन्स पेजवर युझर्स वाढवण्यासाठी जेना इतर सोशल मीडियाचीही मदत घेते. तिने सांगितले की, ती फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर आधी काही लहान लहान क्लिप्स टाकते. त्यानंतर आपले अकाऊंट डिलीट करते. त्यामुळे तिला पाहण्याची इच्छा असणारे नाईलाजास्तव ओन्ली फॅन्सचे सब्सक्रिप्शन घेतात. त्यामुळे पेजची पब्लिसिटी होते. अॅडल्ट कंटेंट जनरेटर जेना हिने सांगितले की, अनेकजण तिच्यावर निगेटिव्ह कमेंट्स करतात. मात्र ती सांगते की, ती फॉलोअर्सना सातत्याने असे कंटेट देते, असे तिने सांगितले.