Raksha Bandhan 2020: इको फ्रेंडली 'कोरोना राखी' सुपरहिट; ग्राहकांकडून मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 04:57 PM2020-08-03T16:57:23+5:302020-08-03T16:57:48+5:30
Raksha Bandhan 2020: नव्या संकल्पनेला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद; कोरोना राखीला मोठी मागणी
हैदराबाद: देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा होत आहे. मात्र कोरोना संकटामुळे रक्षाबंधनावेळी असणारा असलेला उत्साह दिसत नाही. त्यामुळे यंदा राख्यांना फारशी मागणी आहे. मात्र तेलंगणामधल्या एका दुकानात विकली जाणारी कोरोना राखी सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. ही राखी पर्यावरणपूरक असून ती शेणापासून तयार करण्यात आली आहे.
कोरोना संकटाचा मोठा फटका रक्षाबंधनाला बसला आहे. मात्र या परिस्थितीतही काहींनी कल्पना लढवत नवे मार्ग शोधले आहेत. तेलंगणात आकाश नावाची व्यक्ती कोरोना राखी विकत आहे. 'यावर्षी कोरोनामुळे विक्रीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे राखी विकल्या जाव्यात यासाठी मी काहीतरी नवीन करण्याचं ठरवलं. यावर्षी मी गायीच्या शेणापासून तयाप केलेल्या कोरोना राख्या विकत आहे. काही लोकांनी त्या खरेदी केल्या आणि त्या त्यांना आवडल्या,' असं आकाश यांनी सांगितलं.
Telangana: People in Hyderabad purchase rakhis ahead of #RakshaBandhan tomorrow. A shop owner says, "We have all types of rakhis but the sale is comparatively low due to #COVID19, we faced difficulty in procuring raw material. This yr we're also offering rakhis made of cow-dung" pic.twitter.com/8zlTn3b0zP
— ANI (@ANI) August 2, 2020
काही जण सण लक्षात घेऊन व्यवसाय करतात. मात्र कोरोनामुळे व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. 'मी तयार केलेल्या राख्या विकल्या जातील का, याबद्दल साशंकता होती. मात्र त्यांची विक्री होणं अत्यंत गरजेचं होतं. अन्यथा मोठं नुकसान झालं असतं. राख्यांच्या विक्रीसाठी आणखी वर्षभर वाट पाहावी लागली असती,' अशा शब्दांत आकाश यांनी व्यवसायातील समस्या बोलून दाखवली.
कोरोनामुळे यंदा रक्षाबंधन दरवर्षीप्रमाणे साजरं होताना दिसत नाही. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक जण बाहेर पडलेले नाहीत. अनेकांनी रक्षाबंधन साजरं करणं नाईलाजास्तव टाळलं आहे. त्याचा फटका राखी उत्पादकांना आणि विक्रेत्यांना बसला आहे. राख्यांची बाजारपेठ काही हजार कोटींची आहे. या बाजारपेठेला यंदा कोरोनामुळे फटका बसला आहे.