हैदराबाद: देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा होत आहे. मात्र कोरोना संकटामुळे रक्षाबंधनावेळी असणारा असलेला उत्साह दिसत नाही. त्यामुळे यंदा राख्यांना फारशी मागणी आहे. मात्र तेलंगणामधल्या एका दुकानात विकली जाणारी कोरोना राखी सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. ही राखी पर्यावरणपूरक असून ती शेणापासून तयार करण्यात आली आहे.कोरोना संकटाचा मोठा फटका रक्षाबंधनाला बसला आहे. मात्र या परिस्थितीतही काहींनी कल्पना लढवत नवे मार्ग शोधले आहेत. तेलंगणात आकाश नावाची व्यक्ती कोरोना राखी विकत आहे. 'यावर्षी कोरोनामुळे विक्रीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे राखी विकल्या जाव्यात यासाठी मी काहीतरी नवीन करण्याचं ठरवलं. यावर्षी मी गायीच्या शेणापासून तयाप केलेल्या कोरोना राख्या विकत आहे. काही लोकांनी त्या खरेदी केल्या आणि त्या त्यांना आवडल्या,' असं आकाश यांनी सांगितलं.
Raksha Bandhan 2020: इको फ्रेंडली 'कोरोना राखी' सुपरहिट; ग्राहकांकडून मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 4:57 PM