अनेकदा आपण हे ऐकतो की, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. त्यासाठी ज्योतिषांकडे पत्रिका वगैरे जुळवल्या जातात. पण जगात एक असाही देश आहे जिथे या सर्व गोष्टी जुन्या झाल्या आहेत. इथे लग्नाच्या गाठी स्वर्गात नाही तर रोबोट द्वारे जुळवल्या जातात.
नुकताच जपानची राजधानी टोकियोमध्ये जीवनसाथी शोधण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यात मुला-मुलींसोबतच काही रोबोट्सनी सुद्धा सहभाग घेतला होता. खरंतर रोबोट्स जे मुलं-मुली बोलण्यासाठी लाजत होते. त्यांच्या गोष्टी ऐकमेकांपर्यत पोहचवत होते. म्हणजे रोबोट पोस्टमनचं काम करत होते.
टोकियो येथील आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, रोबोटिक्स यात काम करणारी कंपनी कन्टेट इनोवेशन प्रोग्राम असोसिएशनने हा कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यात २५ ते ३९ वयोगटातील २८ मुलं-मुलींनी सहभाग घेतला होता. आश्चर्याची बाब म्हणजे या रोबोट्समुळे चार जोडप्यांचं लग्नही ठरलं.
या रोबोट्समध्ये मुला-मुलींशी संबंधित इच्छा, आवडी आणि नोकरी यासारखी माहिती फिड करण्यात आली होती. आणि त्याच आधारावर या कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आलेत. कन्टेन्ट इनोवेशन प्रोग्रामच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे रोबोट्स अशा लोकांची मदत करत आहेत, जे त्यांच्या लग्नाची बोलणी करू शकत नाहीत किंवा ज्यांना या गोष्टी बोलण्यात लाज येते.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका तरूणीने सांगितले की, मला रोबोटच्या मदतीने मला हवा होता तसाच जोडीदार मिळाला. तर एका तरूणाने सांगितले की, रोबोटने माझी फार मदत केली. त्यांना माझ्याबाबत सगळंकाही समजून मुलीसमोर सांगितलं. मला काही बोलण्याची गरज पडली नाही.
जपानमध्ये अशाप्रकारचे कार्यक्रम नेहमी होत असतात. ज्यात लोक स्वत:साठी पार्टनर शोधतात. याला जपानी भाषेत 'कोनकात्सु' म्हटले जाते. पण पहिल्यांदाच असं झालं की, दोन लोकांच्या एकमेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एखाद्या रोबोटची मदत घेतली गेली.