कोणताही नियम तोडणं हा गुन्हा आहे. नियम तोडला की, त्यासाठी शिक्षा म्हणून दंड भरावा लागतो. पण अनेकजण दंड भरणं टाळतात किंवा तो भरावा लागू नये म्हणून उपाय शोधत राहतात. असंच नियम तोडल्यावर दंड न भरणं एका तरूणीला चांगलंच महागात पडलं आहे. ही घटना आहे रशियातील. इथे एका सोशल मीडिया स्टारने तब्बल १९९ चालान भरले नाहीत. मग काय पोलीस तिची लॅम्बॉर्गिनी कार उचलून घेऊन गेले.
इंडिया टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, Nastya Ivleeva एक ब्लॉगर आहे. इन्स्टाग्रामवर तिने १० कोटी ८० लाख फॉलोअर्स आहेत. इतक्या मोठ्या सोशल मीडिया स्टारची कार पोलीस घेऊन गेले कारण तिने फाइन भरला नव्हता.
मीडिया रिपोर्टनुसार, Ivleeva मॉस्कोची राहणारी आहे. गेल्या एका वर्षात तिला ट्रॅफिक नियम तोडल्या प्रकरणी १९९ वेळा चालान मिळालं आहे. तिच्याकडे लॅम्बॉर्गिनी कार असून या कारची किंमत १ कोटी ९४ लाख रूपये आहे.
ती म्हणाली की, 'हे पहिल्यांदाच झालं की, माझी कार माझ्यापासून दूर केली गेली. आता मी लवकरच चालान भरून आपली कार चालवणार आहे'. तिला चालान कार वेगाने चालवण्यासाठी, लाइन क्रॉस करण्यासाठ आणि बेकायदेशीर टर्न घेण्यासाठी फाडण्यात आले होते. नंतर तिने सर्व चालान भरले आणि ती तिची कार घेऊन गेली.