हौसेला मोल नाही! महिन्याभरात तब्बल 1.5 लाखांचं पाणी पितो 'हा' तरुण; 'हे' आहे कारण, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 04:45 PM2022-02-22T16:45:57+5:302022-02-22T16:51:58+5:30

Ryan Dubs And Water : एक तरुण दर महिन्याला तब्बल दीड लाखांचं पाणी पित असल्याची घटना आता समोर आली आहे. सध्या त्याचीच सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. 

Ryan Dubs spends lakhs in a month only on drinking high end water | हौसेला मोल नाही! महिन्याभरात तब्बल 1.5 लाखांचं पाणी पितो 'हा' तरुण; 'हे' आहे कारण, Video व्हायरल

हौसेला मोल नाही! महिन्याभरात तब्बल 1.5 लाखांचं पाणी पितो 'हा' तरुण; 'हे' आहे कारण, Video व्हायरल

Next

कोणाला कधी काय आवडेल याबद्दल काहीच सांगू शकत नाही. अनेकांना भलतेच शौक असतात. काही लोक आपल्या हौसेखातर वाटेल तेवढे पैसे खर्च करतात. पण तुम्हाला जर कोणी पाण्यावर पाण्यासारखा पैसा खर्च केल्याचं सांगितलं. तर सुरुवातीला खोटं वाटेल किंवा विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. एक तरुण दर महिन्याला तब्बल दीड लाखांचं पाणी पित असल्याची घटना आता समोर आली आहे. सध्या त्याचीच सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. 

रेयान डब्स (Ryan Dubs) नावाच्या एका व्यक्तीने दावा केला आहे की, पाण्याबाबत तो इतको सिलेक्टीव्ह आहे की, एकाच ब्रँडचं पाणी पितो आणि यासाठी दर महिन्याला लाखो रुपये खर्च करतो. TikTok वर @ryandubs नावाच्या अकाऊंटवरुन रेयानने सांगितलं की, तो दर महिन्याला महागातलं पाणी पितो. यासाठी तो तब्बल  $2,000 म्हणजे जवळपास 1.5 लाख रुपये खर्च करतो. रेयान पाण्याबद्दल खूप जास्त सिलेक्टिव्ह आहे आणि त्याला याच चवीचं पाणी आवडतं म्हणून तो यासाठी लाखो रुपये खर्च करतो.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या टिकटॉक व्हिडीओमध्ये रेयानने दावा केला आहे की, तो दर महिन्याला महागातलं महाग पाणी पितो. यासाठी तो तब्बल दीड लाख रुपये खर्च करतो. हे पाणी सरळ त्याच्या घरी डिलिव्हर होतं. रेयान म्हणतो की, सर्व पाणी मी फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवतो. यासाठी त्याने घरात 4 फ्रिज ठेवले आहेत.

तो विशेषत: VOSS नावाच्या ब्रँडचं पाणी पितो. लोक त्याला अनेकदा विचारतात की, तो पाण्याबद्दल इतका जागरूक का आहे? यावर तो म्हणतो की, त्याला नळातून येणारं पाणी आवडत नाही. त्यामुळे तो ते पाणी पिऊ शकत नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
 

Web Title: Ryan Dubs spends lakhs in a month only on drinking high end water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.