VIDEO : मंगळ ग्रहाचे आश्चर्यकारक फोटो आले समोर, हिरव्या रंगाच्या रिंगने घातला वेढा....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 01:25 PM2020-06-19T13:25:50+5:302020-06-19T13:30:55+5:30

स्पेस डॉट कॉमनुसार, मंगळ ग्रहाच्या चारही बाजूने असलेल्या या हिरव्या गोळ्यात ऑक्सिजन असू शकतं, ज्यामुळे ही रिंग या रंगाची दिसत आहे.

Scientists spot strange green glow around mars in bombshell space discovery | VIDEO : मंगळ ग्रहाचे आश्चर्यकारक फोटो आले समोर, हिरव्या रंगाच्या रिंगने घातला वेढा....

VIDEO : मंगळ ग्रहाचे आश्चर्यकारक फोटो आले समोर, हिरव्या रंगाच्या रिंगने घातला वेढा....

googlenewsNext

युरोपियन स्पेस एजन्सी गॅस ऑर्बिटरने मंगळ ग्रहचे काही नवीन आश्चर्यकारक फोटो काढले आहेत. या फोटोंमध्ये मंगळ ग्रह हिरव्या रंगाच्या एका रिंगने वेढलेला दिसतोय. हा नजारा काही अंशी पृथ्वीवरील वातावरणासारखा दिसतोय. स्पेस डॉट कॉमनुसार, मंगळ ग्रहाच्या चारही बाजूने असलेल्या या हिरव्या गोळ्यात ऑक्सिजन असू शकतं, ज्यामुळे ही रिंग या रंगाची दिसत आहे.

बेल्जिअम युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक जीन क्लाउड गेरार्ड सांगतात की, एखाद्या दुसऱ्या ग्रहावरून जेव्हा पहिल्यांदा पृथ्वीचा फोटो घेण्यात आला होता तेव्हा अशाप्रकारची एक हिरव्या रंगाचा थर दिसला होता. त्यांच्यानुसार या फोटोंवरून हे स्पष्टपणे सिद्ध होतं की, मंगळावर ऑक्सिजन आहे. गेरार्ड यांच्यानुसार, हे दृश्य नॉर्दन लाइट्ससारखं आहे. नॉर्वे, आइसलॅंड आणि इतर स्कॅन्डवेनियन देशांवरील आकाशातही रात्रीच्या वेळी अशाप्रकारचा हिरव्या रंगाचा थर बघायला मिळतो.

स्पेस डॉट कॉमनुसार, वातावरणात फार वर जेव्हा सूर्याची किरणे आणि ऑक्सिजनच्या कणांची टक्कर होते तेव्हा अशाप्रकारचा प्रकाश तयार होतो. नायट्रोजन आणि ऑक्सिजनचे परमाणु जेव्हा सूर्याच्या प्रकाशातून तुटतात तेव्हा याप्रकारचा हिरवा-निळा प्रकाश निर्माण होतो.  

दरम्यान मंगळावर जीवन अनुकूल परिस्थिती तयार करण्यासाठी रिसर्च सुरू आहे. नासाचे रोवर मंगळ ग्रहावर फिरत आहेत. तसेच जुलैमध्ये आणखी एक रोवर पाठवला जाणार आहे. अशात या फोटोंमुळे रिसर्चना वेग आणि नवी दिशा मिळणार आहे.

Web Title: Scientists spot strange green glow around mars in bombshell space discovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.