आपण सर्वांनी लहानपणापासूनच आपल्या बुद्धीला चालना देण्यासाठी किंवा परीक्षा घेण्यासाठी काही ना काही कोडी सोडवली असतीलच. जो सर्वातआधी आणि कमीत कमी वेळात कोडं सोडवतो त्याला आपण स्मार्ट समजतो. सध्या अशीच काही कोडी आणि डोकॅलिटी लढवण्यास भाग पाडणारी काही हटके कोडी सोशल मीडियात व्हायरल होत असतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हाला या फोटोचं सत्य काय आहे हे समजू शकणार नाही. तुमची दृष्टी तीक्ष्ण आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तरच तुम्ही या फोटोचं महत्व समजू शकता.
तुम्हाला वरील चित्रात काय दिसतंय? झाडाचं खोड, लाकूड तर आहेच. पण यात एका पक्ष्याचा आकारही दडला. हे चित्र नीट पाहिल्यास एक घुबडही तुम्हाला दिसेल. घुबडाचे डोळे उघडे आहेत. फोटो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हा खरा फोटो आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वन अधिकारी सुशांत नंदा यांनी हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला 638 लोकांनी लाईक केले आहे, तर अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.