आरारारारा खतरनाक! 'या' व्यक्तीने घेतला जगातला सर्वात खतरनाक 'सेल्फी', बघून फुटेल तुम्हाला घाम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 03:32 PM2021-12-17T15:32:41+5:302021-12-17T15:55:26+5:30
Selfie With Leopard : बिबट्या अचानक तुमच्या समोर आला तर काय होईल? अर्थातच कुणालाही घाम फुटेल. पण एका व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक व्यक्ती बिबट्या समोरच हैराण करणारं काम करताना दिसला आहे.
बिबट्या हा किती खतरनाक प्राणी असतो हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. तो आपली शिकार दिसल्यावर फुल स्पीडने हल्ला करतो आणि काही सेकंदात शिकारीवर मात करतो. बिबट्या त्याच्या शिकारीच्या टेक्नीकसाठी फारच फेमस आहे. अशात विचार करा की, बिबट्या (Leopard) अचानक तुमच्या समोर आला तर काय होईल? अर्थातच कुणालाही घाम फुटेल. पण एका व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक व्यक्ती बिबट्या समोरच हैराण करणारं काम करताना दिसला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका जीपमध्ये काही लोक जंगल सफारीचा आनंद घेत आहेत. अशातच एक बिबट्या कारवर चढतो, तेव्हा गाडीतील लोक त्याचा व्हिडीओ काढू लागतात. फोटो काढतात. सोबतच बिबट्या इतक्या जवळ आल्याने त्यांची हालतही खराब होते. अशातच एक व्यक्ती कारमध्ये उभा होतो आणि बिबट्याजवळ जाऊन सेल्फी घेऊ लागतो. हे बघून जीपमधील इतर लोक हैराण होतात.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, ही व्यक्ती आरामात, अजिबात न घाबरता बिबट्याजवळ जाऊन सेल्फी (Selfie With Leopard) घेऊ लागतो. तर जीपमधील लोक त्याचा व्हिडीओ काढतात. यावेळी जीपमधील लोकांचे घाबरलेले एक्सप्रेशनही तुम्ही बघू शकता. बिबट्याही या व्यक्तीला आरामात सेल्फी घेऊ देतो.
हा सेल्फी पाहून कुणीही हेच म्हणेल की, हा आहे जगातला सर्वात खतरनाक सेल्फी. कारण बिबट्याजवळ जऊन सेल्फी घेणं सोडाच त्याला दुरून बघूनच अनेकांना घाम फुटतो. बिबट्या हा त्याची शिकार पकडण्यासाठी सामान्यपणे ५६ ते ६० किमी प्रति तासाच्या वेगाने धावतो. बिबट्याची ताकद अशी असते की, त्याला जंगलातील अनेक प्राणी घाबरतात.