वाघ आणि बकरीची जगप्रसिद्ध मैत्री तुटणार, लोकांचा विरोध!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 12:28 PM2019-02-05T12:28:53+5:302019-02-05T12:31:47+5:30
रशियातील प्रिमोर्स्की सफारी पार्कमधील एका वाघाच्या आणि बकरीच्या मैत्रीची जगभरात उदाहरणे दिली जात होती. एकदा या पार्कमधील वाघाला खाण्यासाठी एका जिवंत बकरी देण्यात आली.
रशियातील प्रिमोर्स्की सफारी पार्कमधील एका वाघाच्या आणि बकरीच्या मैत्रीची जगभरात उदाहरणे दिली जात होती. एकदा या पार्कमधील वाघाला खाण्यासाठी एक जिवंत बकरी देण्यात आली. मात्र वाघाने तिची शिकार केली नाही. उलट बकरीनेच वाघावर हल्ला केला. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. पण आता या वाघाची आणि बकरीची मैत्री तुटणार आहे.
या पार्कमधील वाघाचं नाव आमूर आहे. तर बकरीचं नाव तिमूर आहे. दोघेही २०१५ पासून सोबत राहत आहेत. पण आता वाघाला दुसऱ्या पार्कमध्ये शिफ्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या वाघाच्या बहिणीला आधीच शिफ्ट करण्यात आलं आहे.
रिपोर्ट्सनुसार, आमूरला दुसऱ्या पार्कमध्ये शिफ्ट करण्याच्या आदेशाला हजारो लोकांकडून विरोध करण्यात येत आहे. तब्बल १० हजार लोकांनी वाघ आणि बकरीची मैत्री वाचवण्यासाटई एक पिटीशन साइन करून दोघांना एकत्र राहू देण्याची मागणी केली आहे.
आमूर आणि तिमूरची मैत्री पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक प्रिमोर्स्की पार्कमध्ये येतात. या दोघांच्या मैत्रीमुळेच प्रिमोर्स्की सफारी पार्क जगभरात प्रसिद्ध झाला आहे.