एक असा 'देश' जिथे राहतात केवळ 35 लोक आणि 4 श्वान, हुकूमशहा आहे राष्ट्राध्यक्ष!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 10:30 AM2024-05-01T10:30:50+5:302024-05-01T10:50:47+5:30
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या देशाची एकूण लोकसंख्या 39 आहे. ज्यात 35 लोक आणि 4 श्वानांचा समावेश आहे.
वेगवेगळ्या देशांमध्ये जेव्हा एखादा मंत्री किंवा आमदार किंवा खासदार बाहेर पडतो तेव्हा त्यांच्यामागे गाड्यांचा मोठा ताफा असतो. मोठी सुरक्षा असते. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा देशाबाबत सांगणार आहोत जेथील राष्ट्राध्यक्ष बिनधास्त रस्त्यांवर फिरतात आणि त्यांच्यामागे सुरक्षाही नसते. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या देशाची एकूण लोकसंख्या 39 आहे. ज्यात 35 लोक आणि 4 श्वानांचा समावेश आहे. या देशाचं नाव आहे मोलोसिया जो एक मायक्रोनेशन आहे.
अमेरिकेच्या नेवाडामधील या देशात वेगवेगळे कायदे, संस्कृती आणि त्यांची वेगळी करन्सी आहे. 1977 मध्ये केविन बॉघ आणि त्यांच्या एका मित्राने वेगळा देश बनवण्याचा विचार केला होता. दोघांनी मोलोसिया (Molossia) ला एक मायक्रोनेशन बनवलं. तेव्हापासून केविन या छोट्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांनी स्वत:ला येथील हुकूमशहा घोषित केलं आहे. तर त्यांच्या पत्नीला इथे First Lady चा का दर्जा मिळाला आहे.
केविन यानी ज्या मित्रासोबत या छोट्या देशाची स्थापना केली होती त्यानी काही महिन्यांनी या आयडियाचा त्याग केला होता. पण केविन यानी ही आयडिया सोडली नाही. इथे राहणारे जास्तीत जास्त नागरिक हे केविनचे नातेवाईक आहेत. जे या देशाच्या सीमेच्या आजूबाजूला राहतात. पण या देशाला जगातील कोणत्याही देशाने मान्यता दिलेली नाही. या देशात दुकाने, लायब्ररी, स्मशानभूमीसोबतच इतरही अनेक सुविधा आहेत. बरेच लोक या देशात फिरायला येतात. पण इथे येण्यासाठी लोकांना त्यांच्या पासपोर्टवर पर स्टॅम्प लावाला लागतो.
गेल्या 40 वर्षापासून केविन इथे येणाऱ्या पर्यटकांना फिरवतात. या देशात फिरण्यासाठी 2 तासांचा वेळ लागतो. फिरायला येणाऱ्या लोकांचं मत असतं की, इतका मिनमिळावू हुकूमशहा कुठेही बघायला मिळत नाही.
मोलोसियाच्या वेबसाइटवर असलेल्या माहितीनुसार, या देशाचं एकूण क्षेत्रफळ 11.3 एकर आहे. तर याची राजधानी बॉघस्टन आहे. इथे 26 मे रोजी नॅशनल हॉलिडे असतो. भलेही केविनने मोलोसिया स्वतंत्र देश घोषित केला असेल, पण तो आता अमेरिकेचा भाग आहे.