या माणसाची जीभ आहे सर्वात लांब, जीभेने चित्र काढतो अन् पत्र सुद्ध लिहितो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 04:50 PM2022-03-30T16:50:57+5:302022-03-30T16:51:12+5:30

२१ वर्षीय तरुणाच्या जिभेची लांबी (Man with longest Tounge in India) सर्वसामान्य माणसांच्या जिभेपेक्षा बरीच जास्त आहे. १०.८ सेंटिमीटर इतक्या लांबीची जीभ असणाऱ्या प्रवीणचं नाव इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये (India Book of Records) दाखल झालेलं आहे

Tamilnadu man have 10.8 centimeter tongue world longest tongue trying to win the world record | या माणसाची जीभ आहे सर्वात लांब, जीभेने चित्र काढतो अन् पत्र सुद्ध लिहितो

या माणसाची जीभ आहे सर्वात लांब, जीभेने चित्र काढतो अन् पत्र सुद्ध लिहितो

googlenewsNext

जुबान कितनी लंबी है आपकी!' जास्त बोलणाऱ्या माणसाला उद्देशून म्हटली जाणारी हिंदी भाषेतली ही म्हण तुम्ही ऐकली असेल. परंतु प्रत्यक्षात मात्र कुणाचीही जीभ गरजेपेक्षा लांब नसते. तमिळनाडूमधल्या (Tamilnadu) तिरुथलंगलमध्ये राहणाऱ्या, के. के. प्रवीण या २१ वर्षीय तरुणाच्या जिभेची लांबी (Man with longest Tounge in India) सर्वसामान्य माणसांच्या जिभेपेक्षा बरीच जास्त आहे. १०.८ सेंटिमीटर इतक्या लांबीची जीभ असणाऱ्या प्रवीणचं नाव इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये (India Book of Records) दाखल झालेलं आहे.

एडिंबरा विद्यापीठाने (University of Edinburgh) दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या पुरुषाची जीभ सरासरी ८.५ सेंटिमीटर लांब असू शकते. प्रवीणची जीभ ह्या सरासरीपेक्षा २.५ सेंटिमीटर जास्त लांब आहे. भारतातली सर्वांत लांब जीभ असलेली व्यक्ती असा मान त्याला मिळालाच आहे. संपूर्ण जगातही त्याचीच जीभ सर्वांत जास्त लांब असू शकेल.

 रोबॉटिक्स शिकणारा के. प्रवीण नेहमीच त्याच्या लांबलचक जिभेमुळे चर्चेचा केंद्रबिंदू ठरतो. मित्र आणि कुटुंबीयांसमोर तो आपल्या लांब जिभेने वेगवेगळ्या करामती करत असतो. कधी तो नाकाला जीभ लावून दाखवतो, तर कधी हाताच्या कोपरालासुद्धा जिभेने स्पर्श करून दाखवत असतो. त्याच्या जिभेची लांबी इतकी आहे, की तो आपल्या पापण्यांनाही ती लावण्याचा प्रयत्न करत राहतो. पैशांची चणचण असल्यामुळे प्रवीण आतापर्यंत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं जाण्यासाठी अर्ज करू शकला नाही. परंतु लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (Limca Book of Records) त्याचं नाव नोंदवलं गेलं आहे. भारतातली सर्वांत लांब जीभ असलेली व्यक्ती (Man with longest tongue in India) म्हणून अधिकृतरीत्या त्याची नोंद झालेली आहे.

प्रवीणचं नाव एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही (Asia Book of Records) नोंदवलं गेलं आहे. त्याने एका मिनिटात जिभेने २१९ वेळा नाकाला स्पर्श केला होता. एवढंच नाही, तर त्याने खेकरी मुद्रा ह्या वादग्रस्त ठरलेल्या योगमुद्रेचंही प्रशिक्षण घेतलं आहे. ह्यामध्ये व्यक्ती आपली जीभ आत घेऊन श्वसनमार्गापर्यंत नेते. पाहणाऱ्याला त्या व्यक्तीच्या तोंडात जीभ दिसत (Invisible Tongue) नाही. सध्या विश्वविक्रमासाठी (World Record) आपलं नाव नोंदविलं जाण्याचं लक्ष्य त्याने ठेवलं आहे. हा विक्रम आतापर्यंत कॅलिफोर्नियाच्या निक स्टोबर्लच्या नावावर आहे. त्याची जीभ १०.१ सेंटिमीटर लांब आहे. प्रवीणच्या जिभेची लांबी त्यापेक्षा ०.८ सेंटिमीटरने जास्त आहे. आता विश्वविक्रम नोंदवला जाण्यासाठी तो निधी गोळा करत आहे.

आपल्या लांब जिभेचा कधीच त्रास झाला नाही, असं प्रवीण सांगतो. तसंच चित्र काढण्यासाठी आणि रंगवण्यासाठीसुद्धा प्रवीण जिभेचा वापर करतो. विशेष म्हणजे तो जिभेने तमिळ भाषेत पत्रसुद्धा लिहितो.

Web Title: Tamilnadu man have 10.8 centimeter tongue world longest tongue trying to win the world record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.