पॅरिसमध्ये सोमवारी एका चोराने जपानी उद्योगपतीच्या हातातून ८४०,००० डॉलर म्हणजेच जवळपास ६ कोटी रूपयांची घड्याळ लांबवली आहे. ही स्विस घड्याळ होती, ज्यावर हिरे जडलेले होते. चोर अजूनही हाती लागले नसून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत. अशात चोराने उद्योगतीच्या हातातून घड्याळ कशी काढली हे जाणून घेऊ.
रिपोर्ट्नुसार, उद्योगपती आर्क डि ट्रायम्फजवळ असलेल्या नेपोलियन या फाईव्ह स्टार हॉटेलमधून बाहेर आला होता. इथे एका व्यक्तीने त्याला सिगारेटसाठी विचारलं. जसा उद्योगपतीने हात बाहेर काढला, चोराने त्याचं मनगट पकडलं आणि किंमती घड्याळ घेऊन पसार झाला.
ही घड्याळ Richard Mille कंपनीची महागडी घड्याळ आहे. रिपोर्ट्सनुसार, फ्रान्सच्या राजधानीतील हे चोर पर्यटकांना लक्ष्य करत आहेत. त्यांच्या किंमती वस्तू चोरत आहेत.
जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत पॅरिसमध्ये आणि आजूबाजूला ७१ चोऱ्या झाल्यात. ज्यातील ४ चोऱ्या Richard Mille घड्याळाच्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरी करून पळताना चोराचा फोन खाली पडला. त्यानुसार आता पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.