फळांचा राजा आंबा आहे तर माहीत असेलच मग फळांची राणी कोण? जाणून घ्या उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 04:50 PM2024-06-04T16:50:40+5:302024-06-04T17:04:19+5:30

The Queen Of Fruits : हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, फळांचा राजा हा आंबा आहे. पण तुम्हाला फळांची राणी माहीत आहे का? कदाचित अनेकांना याचं उत्तर माहीत नसेल.

This Fruit Is Known As The Queen Of Fruits | फळांचा राजा आंबा आहे तर माहीत असेलच मग फळांची राणी कोण? जाणून घ्या उत्तर...

फळांचा राजा आंबा आहे तर माहीत असेलच मग फळांची राणी कोण? जाणून घ्या उत्तर...

The Queen Of Fruits : उन्हाळा म्हटला की, सगळेजण वाट बघत असतात ते आंब्यांवर ताव मारण्याची. या दिवसांमध्ये लोक आंब्यांचा भरपूर आनंद घेतात. कधी कापून तर कधी त्यांचा रस सेवन करतात. लहान असो वा मोठे सगळ्यांनाच आंबे आवडतात. आंबा आवडत नाही असा क्वचितच एखादा सापडेल. त्यामुळे आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं. हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, फळांचा राजा हा आंबा आहे. पण तुम्हाला फळांची राणी माहीत आहे का? कदाचित अनेकांना याचं उत्तर माहीत नसेल. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आंबा हा सगळ्यांनाच आवडतो आणि हे आतापासून नाही तर खूप आधीपासून आंबा हा फळांचा राजा म्हटला जातो. आंब्याची गोड गोड टेस्ट आणि मनाला मोहिनी घालणारा सुगंध सगळ्यांना हवाहवासा वाटत असतो. 

फळांचा राजा हा आंबा आहे सगळ्यांना माहीत असतं. पण फळांची राणी कोणती याचा फारसा कुणी विचार करत नाही. पण आज फळांची राणी तुम्हाला माहीत पडणार आहे. फळांची राणी आहे मॅंगोस्टीन आहे. मॅगोस्टीन फळाला फळांची राणी म्हटलं जातं.

हे फळ प्रामुख्याने थायलॅंड, मलेशिया आणि सिंगापूरमध्ये आढळतं. इथेच याचं जास्त उप्तादन घेतलं जातं. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे मॅंगोस्टीन हे फळं थायलॅंडचं राष्ट्रीय फळ आहे.

या फळाचं वैज्ञानिक नाव गार्सीनिया मॅंगोस्टाना (Garcinia mangostana) आहे. ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया यांनाही हे फळ खूप आवडीचं होतं. या फळाला इंग्रजीमध्ये मॅंगोस्टीन म्हणतात, हिंदी याला मंगुस्तान म्हटलं जातं.

मॅंगोस्टीनमध्ये भरपूर अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात आणि याने कॅन्सर व हृदयरोगांपासून बचाव होतो. असं म्हटलं जातं की, सर्दी-खोकला झाल्यावर हे फळं खाल्लं तर खूप फायदा मिळतो.

Web Title: This Fruit Is Known As The Queen Of Fruits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.