Tristan da Cunha : काही लोक जगापासून दूर राहणं खूप पसंत करतात. असंच एक बेट आहे ज्यावर केवळ 250 लोक जगापासून दूर राहतात. या बेटाचं नाव आहे ट्रिस्टन दा कुन्हा बेट. 7 जुलै 2023 ला रिलीज डेटानुसार, येथील लोकसंख्या केवळ 244 राहिली आहे. विकिपीडियावर उपलब्ध माहितीनुसार, 2016 च्या जनगणनेनुसार, ट्रिस्टन दा कुन्हा बेटावर 293 लोक राहत होते. हे ठिकाण असं आहे जिथे लोक सुट्यांमध्ये फिरायला जातात.
समुद्राचं निळं पाणी, डोंगर आणि हिरवळ यामुळे हे ठिकाण खूप वेगळं ठरतं. येथील नजारा एका वेगळ्याच विश्वाचा वाटतो. जर तुम्हाला एखाद्या वेगळ्या ठिकाणी जायचं असेल तर या बेटाचा विचार करू शकता. काही बेट फार सुंदर आणि रहस्यमय असतात. हे असंच बेट आहे. जे जगापासून फार वेगळं आहे. हे जगातील सगळ्यात कमी लोकसंख्या असलेलं बेट आहे.
ट्रिस्टन दा कुन्हा बेट हे जगातील सगळ्यात दूर असलेलं बेट आहे. रिपोर्ट्सनुसार, पोर्तुगालमधील काही अभ्यासकांनी या बेटाचा शोध 1506 मध्ये लावला होता. हे बेट दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउनपासून जवळपास 2787 किमी दूर दक्षिण अटलांटिक महासागरात आहे.
कथितपणे 1816 मध्ये काही ब्रिटिश सैनिक काही लोकांना घेऊन या बेटावर आले होते. त्यात काही लहान मुलेही होती आणि महिलाही होत्या. नेपोलियन बोनापार्टला सेंट हेलेनामध्ये रोखण्यासाठी ब्रिटिश सैनिक या बेटावर आले होते.
जेव्हा स्थिती सुधारली तेव्हा काही सैनिकांनी आणि काही लोकांनी या बेटाला आपलं घर बनवलं. 2018 पर्यंत इथे 250 नागरिक होते. येथील अर्थव्यवस्थेबाबत सांगायचं तर येथील लोक मासेमारीच्या माध्यमातून आपलं कमाई करतात. सोबतच पर्यटनाच्या माध्यमातूनही इथे कमाई होते. खास बाब म्हणजे या बेटावर एकही हॉटेल नाही. सरकारने इथे येणाऱ्या लोकांसाठी होम स्टे ची व्यवस्था केली आहे.
या बेटावर पोहोचण्यासाठी कोणतंही विमानतळ नाही. इथे केवळ बोटीच्या माध्यमातून जाता येतं. या आयलॅंडवर जाण्यासाठी साऊथ आफ्रिकेतून 6 दिवसांचा प्रवास करावा लागतो. ट्रिस्टन दा कुन्हा बेट फार सुंदर आहे. येथील लोक बेट स्वच्छ ठेवतात. लोक शांततेत आणि इतर जगापासून वेगळे राहतात.