नोकरीला ठोकला राम राम! भटकंतीचा छंद जोपासून 'ती' कमावतेय महिना 50 लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 05:20 PM2019-02-16T17:20:46+5:302019-02-16T17:28:44+5:30

भटकंतीची हौस असणारी मंडळी अख्खं जग पालथं घालण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करुन पैसा कमावतात. पण एका मुलीनं आपला फिरण्याचा शौक पूर्ण करण्यासाठी चक्क नोकरीलाच राम-राम ठोकलाय.

travel girl who earn monthly 50 lakhs while traveling around world | नोकरीला ठोकला राम राम! भटकंतीचा छंद जोपासून 'ती' कमावतेय महिना 50 लाख रुपये

नोकरीला ठोकला राम राम! भटकंतीचा छंद जोपासून 'ती' कमावतेय महिना 50 लाख रुपये

Next

1. जगणं शिकवणारा छंद जोपासा
भटकंतीची हौस असणारी मंडळी अख्खं जग पालथं घालण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करुन पैसा कमावतात. पण एका मुलीनं आपला फिरण्याचा शौक पूर्ण करण्यासाठी चक्क नोकरीलाच राम-राम ठोकलाय. आता तुम्ही म्हणाल की, काय वेडी मुलगी आहे. भटकंतीसाठी ठार वेड्या असणाऱ्या या मुलीने फिरण्याच्या हौसेलाच आपल्या आयुष्याच एक अविभाज्य घटक बनवला आहे. एवढंच नाही तर या छंदातूनच ती सध्या लाखो रुपयांचं उत्पन्नदेखील कमावत आहे. फिरण्याच्या आवडतीतूनच ही तरुणी महिन्याला चक्क 50 लाख रुपये कमावत आहेत. उत्पन्नाचा हा आकडा वाचून आता कदाचित तुम्हाला तिचा हेवा वाटला असावा. हो ना?

2. कोण आहे ही तरुणी ?
या 'भटकंती क्वीन'चे नाव Alieen Adalid असे आहे. ती फिलिपिन्स येथील रहिवासी आहे. पण केवळ फिलिपिन्सची नागरिक म्हणून जगण्याऐवजी तिला स्वतःला 'World Citizen' म्हणून संबोधित करायला अधिक आवडते. तीन वर्षांपूर्वी Alieenनं Deutsche Bank तील नोकरी सोडण्याचा निर्णय घेत जगभ्रमंती करण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 21 व्या वर्षी तिनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. 

3. स्वछंद काम करण्यास सुरुवात
नोकरी सोडल्यानंतर Alieenनं स्वतंत्ररित्या काम करण्यास सुरुवात केली. वेब डिझाईनिंग, ग्राफिंक डिझाईनिंग, एसईओ मॅनेजमेंट, ऑनलाइन मार्केटिंग या क्षेत्रांमध्ये तिनं फ्रीलान्सिंग काम करण्यास सुरुवात केली. यांसारख्या कामांच्या माध्यमातून तिनं आपला फिरण्याचा खर्च भरुन काढला.

4. 'डिजिटल बंजारन'चा टॅग
कौतुकास्पद बाब म्हणजे भटकंतीवर असतानाही Alieen कधीही काम करण्यास कंटाळा करत नाही. तिचा हा अनोखा अंदाज पाहून लोक तिला 'डिजिटल बंजारन' म्हणून संबोधित करू लागले आणि याच नावाने आज ती सर्वत्र ओळखली जात आहे. 

5. बहुगुणसंपन्न Alieen 
Alieen बॉयफ्रेंड जोनससहीत adalidgear.com नावाची ऑनलाइन कंपनी चालवते. पर्यटनादरम्यान आवश्यक भासणाऱ्या सर्व वस्तू उपलब्ध करुन देण्याचे काम ही कंपनी करते. याव्यतिरिक्त ती कित्येक ब्रँड्सचे ऑनलाइन मार्केटिंग आणि एसईओ मॅनेजमेंटचे कामदेखील सांभाळते.  iamaileen.com या नावाने ती एक ब्लॉगदेखील चालवते. केवळ चालवतच नाही तर हा ब्लॉग पर्यटन विश्वात अतिशय प्रसिद्ध आहे. 

6. फिरणे केवळ श्रीमंतांचाच छंद नाही 
जगातील सर्व देशांची सफर करण्याचे Alieenचे स्वप्न आहे. सध्या तिनं 50हून अधिक देशांची भ्रमंती केली आहे. तिच्या पासपोर्टवर जर्मनी, फ्रान्स, बेल्जिअम, सिंगापूर, हाँगकाँग, इंडोनेशिया, नॉर्वे आणि भारतासहीत कित्येक देशांचा व्हिसा स्टॅम्प आहे. जग फिरणं केवळ श्रीमंतांचाच छंद नाहीय, हे Alieenला सिद्ध करायचे आहे. कारण आवड आणि सवड असल्यास जगभ्रमंतीचा छंद अगदी कोणीही जोपासू शकतो.

7. नेमके काय आहे ध्येय?
 Alieenला आपल्या जगभ्रमंतीची कहाणी इतरांना ऐकून त्यांना पर्यटन करण्यास प्रोत्साहित करायचे आहे. सोबत अनेकांना ती पर्यटनासंबंधी मार्गदर्शनदेखील करते. जेणेकरुन फिरण्याची हौस असणारी ही मंडळी कोणत्याही देशाला योग्यरितीने ओळखू शकतील आणि त्या देशाच्या रंगात मिसळून जातील.


 

Web Title: travel girl who earn monthly 50 lakhs while traveling around world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.