बाबो! हे आहेत भारतातले सगळ्यात श्रीमंत ५ भिकारी; करोडोंची संपत्ती अन् काय काय आहे जाणून घ्या
By Manali.bagul | Published: February 28, 2021 02:48 PM2021-02-28T14:48:48+5:302021-02-28T15:06:36+5:30
Indias richest beggars : रस्त्यावरचे भिकारी पाहिले की अनेकांना त्यांची दया येते. पण तुमचा विश्वास बसणार नाही. काही भिखारी हे सगळ्यात जास्त पैसै कमावतात. आज आम्ही तुम्हाला जगातल्या ५ भिकाऱ्यांबाबत सांगणार आहोत.
जगातल्या प्रत्येक व्यक्तीला आपलं आणि कुटुंबाचं पोट भरण्यासाठी काहीना काही काम करून पैसे मिळवावे लागतात. तुम्ही किती कमावता आणि किती खर्च करता, हे तुम्ही कुठे राहता? तुमची जीवनशैली कशी आहे यावर अवलंबून असतं. रस्त्यावरचे भिकारी पाहिले की अनेकांना त्यांची दया येते. पण तुमचा विश्वास बसणार नाही. काही भिखारी हे सगळ्यात जास्त पैसै कमावतात. आज आम्ही तुम्हाला जगातल्या ५ भिकाऱ्यांबाबत सांगणार आहोत.
भारताच्या या सुपर रिच भिकाऱ्यांकडे स्वतःचे फ्लॅटस आणि खूप संपत्ती आहे. याशिवाय मोठा बँक बॅलेन्ससुद्धा आहे. तरिसुद्धा हे लोक रस्त्यावर भीक मागताना दिसून येतात. एका रिपोर्टनुसार भारतातील सगळ्यात श्रीमंत भिकाऱ्यांमध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं भारत जैन या माणसाचं. मुंबईच्या परेल परिसरात हा माणूस भीक मागतो. रिपोर्ट्नुसार या माणसाकडे ७० लाख रुपयांचे दोन फ्लॅट्स आहेत. दर महिन्याला हा माणूस भीक मागून ७५,००० रूपये मिळवतो. ही रक्कम नोकरी करत असलेल्यांच्या पगाराच्या तुलनेत जास्त आहे.
दुसरा नंबर येतो तो म्हणजे कोलकात्यामधील लक्ष्मी नावाच्या महिलेचा. १९६४ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षापासून तिनं भीक मागायला सुरूवात केली आणि लाखो रुपये कमावले. आजही दर दिवसाला भीक मागून हजार रूपये लक्ष्मी कमावते. म्हणजेच महिन्याला ३० हजार रुपये कमावते.
मुंबईची रहिवासी असलेली गीता श्रीमंत भिकाऱ्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. गीता मुंबईच्या चर्नीरोड परिसरात भीक मागते. तिनं सध्या फ्लॅट विकत घेतला असून ती आपल्या भावासोबत राहते. दर दिवशी ही महिला भीक मागून १,५०० रूपये कमावते. त्याचप्रमाणे भीक मागून आपला उदरनिर्वाह करणारे चंद्र आझाद यांचे गोवंडीला घर असून ८. ७७ लाख रूपये खात्यात जमा आहेत. २०१९ मध्ये एका दुर्घटनेत या माणसानं आपले पाय गमावल्यानंतर पोलिसांनी सर्व संपत्तीचा शोध घेतला. ९० लाखांचा फ्लॅट घेऊन चोरीसाठी खणलं भुयार; डॉक्टरांच्या घरातून 'अशी' लंपास केली कोट्यांवधींची संपत्ती
त्यानंतर बिहारच्या पटनामध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर भीक मागत असलेल्या पप्पूचाही श्रीमंत भिकाऱ्यांमध्ये समावेश होतो. एका अपघातात पाय फॅक्चर झाल्यानंतर त्यानं रेल्वे स्थानकावर भीक मागायला सुरूवात केली. पप्पूकडे सध्या १. २५ कोटींची संपत्ती आहे. बापरे! मच्छीमारांच्या जाळ्यात अडकली गरोदर शार्क; पोट फाडल्यानंतर जे बाहेर आलं ते पाहून बसला धक्का