नवी दिल्ली-
टेस्लाचे (Tesla) संस्थापक आणि सीईओ एलन मस्क (Elon Musk) सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांची संपत्ती २०० बिलियन डॉलरहून अधिक आहे. पण यूकेतील मॅक्स फोश नावाचा व्यक्ती काही मिनिटांसाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला होता. विशेष म्हणजे मॅक्स फोश यांची संपत्ती एलन मस्कच्या संपत्तीपेक्षा दुप्पट झाली होती. पण मॅक्स फोश याचा हा आनंद केवळ काही मिनिटांसाठी मर्यादित होता. कारण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान एलन मस्क यांनी अवघ्या सात मिनिटांत पुन्हा प्राप्त केला.
फोश यानं यूट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड करुन तो कशापद्धतीनं एलन मस्कहून अधिक श्रीमंत झाला याची माहिती दिली आहे. 'कम अॅट मी अलोन', या डिस्क्रिप्शनसह एक व्हिडिओ अपलोड केला आहे. "जर मी अमर्याद संपत्तीसाठी १० अरब शेअर्ससाठी कंपनी स्थापन केली आणि रजिस्ट्रेशन करुन ५० पाऊंडसाठी एक शेअर उपलब्ध करुन दिला. तर कायदेशीररित्या माझ्या कंपनीचं मूल्य ५०० अरब पाऊंड इतकं होईल", असं मॅक्स फोश यानं म्हटलं आहे.
व्हिडिओ होतोय व्हायरलमॅक्श फोश यानं अपलोड केलेला हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून कंपनी रजिस्टर झाली तर तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनेल असा दावा त्यानं व्हिडिओत केला आहे. मॅक्स फोश याचा व्हिडिओ आता यूट्यूबवर सोशल मीडियावर तुफान हिट ठरताना दिसत आहे. एकट्या यूट्यूब चॅनलवर आतापर्यंत ५.७५ लाखाहून अधिक व्ह्यूज प्राप्त झाले आहेत.
यूकेमध्ये कंपनी स्थापन करण्याचा कायदा खूप सोपा आहे. यूकेत मॅक्स फोश यानं अनलिमिटेड मनी लिमिडेट नावानं कंपनी स्थापन केली. कंपनीच्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू आहे. मॅक्सनं मजामस्करीत 'अनलिमिटेड मनी लिमिटेड' नावानं कंपनी स्थापन केली. त्यानं संपूर्ण प्रक्रिया उलगडून सांगतांना म्हटलं की जर १० अब्ज शेअर्ससह एक कंपनीची स्थापना केली गेली आणि ती रजिस्टर झाली व एका शेअरची किंमत ५० पाऊंड आकारली गेली तर कंपनीची किंमत ५०० बिलियन पाऊंड इतकी होईल, अशा पद्धतीनं आपण एलन मस्कपेक्षाही श्रीमंत व्यक्ती होऊ शकतो असं मॅक्स यानं सांगितलं.