तुम्ही कधी एखाद्या अशा गावाबाबत ऐकलंय का ज्या गावाचा सरपंच जेवण वेगळ्या देशात करतो आणि झोपायला दुसऱ्या देशात जातो? जर असं काही तुम्ही ऐकलं नसेल तर आम्ही आज तुम्हाला असंच काहीसं सांगणार आहोत. असंच एक गाव भारतातही आहे. हे गाव जेवढं सुंदर आहे, तेवढीच या गावाची कहाणी आहे.
या अनोख्या गावाचं नाव लोंगवा आहे. या गावाचा अर्धा भाग भारतात आहे तर अर्धा भाग म्यानमारमध्ये आहे. या गावाची आणखी एक खासियत म्हणजे पूर्वीपासून इथे राहणाऱ्या लोकांमध्ये वैऱ्याचं डोकं धडापासून वेगळं करण्याची परंपरा चालू होती. ती आता बंद करण्यात आली आहे.
लोंगवा नागालॅंडच्या मोन जिल्ह्यात घनदाट जंगलात म्यानमारच्या सीमेजवळील भारताचं शेवटचं गाव आहे. इथे कोंयाक आदिवासी लोक राहतात. या लोकांना फारच निर्दशी मानलं जातं. आपल्या कबील्याची सत्ता आणि जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी हे लोक शेजारच्या गावांसोबत भांडणं करत होते.
१९४० मध्ये पहिला कोंयाक आदिवासी आपल्या कबील्यासाठी आणि त्यांच्या जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी दुसऱ्या लोकांची मुंडकी कापत होते. या लोकांना शिकारीही म्हटलं जातं. यांची गावे जास्तकरून डोंगरांच्या टोकावर होते. जेणेकरून विरोधकांवर लक्ष ठेवता यावं.
असेही म्हटले जाते की, हे गाव दोन भागात कसं विभागण्यात यावं? याबाबत काही सुचलं नसल्याने अधिकाऱ्यांनी ठरवलं की, गावाच्या मधोमध एक रेषा आखली जावी. पण कोंयाकवर याचा काहीही फरक पडला नाही. सीमेच्या पीलरवर एकीकडे बर्मीज(म्यानमारची भाषा) आणि दुसरीकडे हिंदीमध्ये मेसेज लिहिले आहेत.
असे म्हणतात की, कोंयाक आदिवास्यांमध्ये गावाचा प्रमुख अशी प्रथा चालते. ही व्यक्ती गावाची प्रमुख असते. त्यांना एकापेक्षा जास्त पत्नी करण्याची सूटही आहे. आता जी व्यक्ती या गावाची प्रमुख आहे, त्याला ६० पत्नी आहेत. भारत आणि म्यानमारची सीमा या प्रमुखाच्या घराच्या मधून जाते. त्यामुळे म्हटलं जातं की, येथील प्रमुख भारतात खातो आणि झोपतो म्यानमारमध्ये.
या गावातील लोकांनी भारत आणि म्यानमार अशी दोन्ही देशाची नागरिकता मिळाली आहे. हे लोक पासपोर्ट आणि विसाशिवायही दोन्ही देशात प्रवास करू शकतात.