साप व्हिडीओ आणि फोटोमध्ये पाहण्यासाठीच चांगला वाटतो. साप समोर येण्याचा विचार केला तरी भीतीने थरकाप होतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का? किचनमध्ये काम करत असताना अचानक साप आल्यानंतर काय होईल. अशीच एक खळबळजनक घटना घडली आहे. ऑस्ट्रेलियामधील एक महिला आपल्या किचनमध्ये साप दिसल्यानंतर खूप घाबरली.
सोशल मीडियावर या महिलेचे फोटो व्हायरल होत आहेत. द डेली मेलच्या रिपोर्ट्नुसार महिलेने जसं टोस्टरमध्ये ब्रेड टाकला तसा हा विषारी बाहेर साप बाहेर आला. हा साप Red Bellied प्रजातीचा आहे. हा साप ऑस्ट्रेलियातील सगळ्यात जास्त विषारी साप आहे.
सापाला पाहिल्यानंतर ही महिला शांत झाली. कारण हालचाल केली तर साप आक्रमण करू शकतो अशी भीती या महिलेच्या मनात होती. त्यानंतर या महिलेनं सापाला पकडत असलेल्या लोकांना बोलावलं. ऑस्ट्रेलियाच्या brisbane north snake catchers and relocation विभागाच्या लोकांनी सापाला बाहेर काढून घेऊन गेले. फेसबूकवर या घटनेबाबत माहिती दिली आहे. लय भारी! माय लेकाची बातच न्यारी, पत्नी किंवा प्रेयसी नाही तर आईसोबत करतोय परदेशवारी
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियामध्ये गरमी वाढल्याने साप मिळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कारण या कालावधीत जंगल सोडून साप इतर ठिकाणी जातात. किचनच्या मागची खिडकी बंद असल्यामुळे सापाला आत येण्यासाठी जागा मिळाली. वाह, नशिब चमकलं! भारताच्या 'या' गावात सापडलं हिऱ्याचं भांडार; अन् लोकांना कळताच.....