video: ऑक्टोपसने पकडला महिला डायव्हरचा हात अन् दाखवला खजिन्याचा मार्ग...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 02:36 PM2024-05-19T14:36:02+5:302024-05-19T14:37:01+5:30
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
Viral News : मानवाने कितीही प्रगती केली असली, तरी त्याला आजपर्यंत समुद्राच्या खोलात दडलेली रहस्ये उलगडता आलेली नाहीत. अशा अनेक ऐतिहासिक कथा-किस्से तुम्ही ऐकले असतील, ज्यात शेकडो हजारो वर्षांपूर्वी खजिन्याने भरलेली जहाजे समुद्रात अचानक बेपत्ता झाली किंवा बुडाली आहेत. अनेक वेळा मानवाला अशाच जहाजांमध्ये दडून ठेवलेला खजिना जाणूनबुजून किंवा नकळत सापडतो. असाच काहीसा प्रकार एका महिला डायव्हरसोबत घडला. ती काही कामासाठी समुद्राच्या खोलात गेली होती, तिथे तिला खजिना सापडला. विशेष बाब म्हणजे, हा खजिना शोधण्यात तिला चक्क एका ऑक्टोपसने मदत केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाची रहिवासी ज्युल्स केसी समुद्रात डायव्हिंगसाठी गेली होती, यावेळी एका ऑक्टोपसने तिचा हात पकडला आणि तिला थेट समुद्राच्या तळाशी दडलेल्या खजिन्याकडे नेले. एका पुरस्कार विजेत्या फोटोग्राफरने हा चमत्कारीक क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या अनुभवाबाबत ज्यूल्स सांगते की, ऑक्टोपस वारंवार तिचा हा पकडून तिला कुठेतरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. सुरुवातीला तिने हात झटकायचे प्रयत्न केले, पण शेवटी ती ऑक्टोबसच्या वाटेवर गेली. ऑक्टोपस तिला स्टीलच्या खांबांमध्ये बांधलेल्या एका कबरीकडे घेऊन गेला. कबर पाहून ज्युल्सला आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे, कबर दाखवल्यानंतर ऑक्टोपस तिथून नाहीसा झाला. त्या कबरीजवळ खजिनाच होता की आणखी काही, हे ज्युल्सने उघड केले नसले तरी, एका ऑक्टोपसने हात धरुन खजिना दाखवणे खरोखरच चमत्कारापेक्षा कमी नाही.