तुम्ही गुप्तहेरी करणाऱ्या अनेक लोकांबाबत ऐकलं असेल. पण तुम्ही कधी ऐकलंय का की, एखाद्या गायीने गुप्तहेरी केली? एका देशावर असाच काहीसा आरोप लागला आहे. गुप्तहेरी करणाऱ्या या गायींना Spy Cow म्हटलं जात आहे. असा दावा आहे की, गायींना ट्रेनिंग देऊन गावातील लोकांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. याची माहिती एका व्यक्तीने दिली. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, त्याने सांगितलं की, गायींना गुप्तहेरी करण्यासाठी वापरणारा देश इस्त्राईल आहे. तो पॅलेस्टिनी नागरिकांवर नजर ठेवतो.
'अल-हयात अल-जदीदा' या पॅलेस्टाईन न्यूज पेपरने दावा केला की, खिबरेट यानुन गावातील वृद्ध व्यक्ती रूश्द मोरार याला एक गाय फिरताना दिसली. त्याने स्थानिक मीडियाला सांगितलं की, ही एक 'प्तहेर गाय' आहे. इस्त्राईल त्याची आणि त्याच्या गावातील लोकांवर नजर ठेवण्यासाठी यांची भरती करत आहे. त्यांना ट्रेनिंग देत आहे. गावातील सगळ्या गोष्टींवर नजर ठेवण्यासाठी गायीच्या गळ्यात एक मेडलसारखी वस्तू लटकवली जाते. ज्यात ऐकण्याचा आणि रेकॉर्ड करण्याचं डिवाइस असतं आणि कधी कधी कॅमेरेही असतात.
असा दावा जानेवारी 2023 मध्येही करण्यात आला होता. पण या पुन्हा असाच दावा करण्यात आला. सध्या इस्त्राईल आणि हमास यांच्या युद्ध सुरू आहे. तेच हे गाव वेस्ट बॅंकच्या ठीक मधात आहे.
दरम्यान सोशल मीडियावर लोकांनी या व्यक्तीचा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. त्यांचं मत आहे की, गायीच्या गळ्यात डिवाइस ट्रॅकर असू शकतं.