बैलावर केले अंत्यसंस्कार, तेराव्याला आले आमदारासह हजारो गावकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 04:25 PM2018-08-07T16:25:43+5:302018-08-07T16:25:54+5:30
मनुष्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार, पिंडदान, तेरावे आधी विधी केले जातात. पण चक्क एका मृत बैलावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.
मुझफ्फरनगर - मनुष्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार, पिंडदान, तेरावे आधी विधी केले जातात. पण उत्तर प्रदेशात चक्क एका मृत बैलावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. एवढंच नाही तर या मृत बैलाचे तेरावेसुद्धात घालण्यात आले. या तेराव्याला स्थानिक आमदारासह सुमारे 5 हजार जण उपस्थित होते.
या बैलाचा 24 जुलै रोजी विजेच्या तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला होता. गाववाल्यांचे या बैलावर खूप प्रेम होते. लोक त्याला नंदी आणि भोला या नावांनी बोलावत असत. दरम्यान, रविवारी त्याचे तेरावे उकावली गावात आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्त होमहवन करण्यात आले. तसेच दुपारी भोजन देण्यात आले. तसेच या बैलापासून झालेल्या बछड्याचा पगडी विधीही करण्यात आला.
स्थानिक नागरिक जनार्दन त्यागी यांनी सांगितले की, गावातील सगळे ग्रामस्थ भोलावर प्रेम करायचे. लहान मुलेसुध्या त्याच्यासोबत खेळत असत. एवढा तो प्रेमळ होता. तसेच गावातील प्रत्येक घरी तो दररोज जाऊन तो खातपित असे. गावातील अन्य नागरिक मनोज त्यागी यांनी सांगितले की, भोलाच्या मृत्यूमुळे गावकऱ्यांना फार दु:ख झाले. गावातील लोक त्याला चांगला निरोप देऊ इच्छित होते. त्यामुळे गावकऱ्यांनी वर्गणी काढून त्याचे तेरावे घातले. या तेराव्याला बुढाना येथील आमदार उमेश मलिक हेसुद्धा उपस्थित होते.