आपल्या देशात असे लोक आहेत. जे भंगाराचं सामान वापरून जुगाड करतात. भंगारातील सामान वापरून वेगवेगळ्या वस्तू तयार केल्याची अनेक उदाहारणं तुम्ही पाहिली असतील. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका ९ वी पास मुलानं भंगारापासून एक बाईक तयार केली आहे. ही घटना छत्तीसगडची आहे. ही बाईक तयार करण्यासाठी या मुलानं पाच गाड्यांच्या भंगाराचा वापर केला आहे. याचे नाव सय्यद सैफ आहे.
हा मुलगा धमतरी जिल्ह्यातील मगरगोल्डच्या सिंगापूर गावातील रहिवासी आहे. सैफचे वडील सायकल मॅकेनिकल आहेत. सैफचे अभ्यासात मन लागत नव्हते. म्हणून त्यानं वडिलांना कामात मदत करायला सुरूवात केली. वडिलांकडून मॅकेनिकलचे काम शिकून सैफ स्वतः तयार झाला आणि भंगारात पडलेल्या वस्तूंचा वापर करून एक आकर्षक बाईक तयार केली. रस्त्यावरून ही बाईक जाते तेव्हा अनेकजण या बाईककडे पाहतात.
सलाम! पदयात्रेदरम्यान तब्येत बिघडली; ५८ वर्षीय महिलेला पाठीवर घेऊन ६ किमी पायी चालला जवान
या बाईकमध्ये त्यानं सुझुकीचे इंजिन आणि यामाहाची बॉडी लावली आहे. अशाप्रकारे पाच गाड्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पार्ट्सचा वापर करून ही आकर्षक बाईक तयार केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारे पार्ट्स जोडून बाईक बनवण्याचे काम मला खूप आवडते. गावातील लोकांना ही बाईक विकत घेण्याची इच्छा सुद्धा आहे.
काही दिवसांपूर्वी गौरव नावाच्या या १० वीच्या मुलानं नावाप्रमाणे गौरव करावा अशी कामगिरी केली होती हा विद्यार्थी चंदीगडचा. घरात किंवा दुकानात जमा झालेला भंडार आणि वापरात नसलेले वस्तूंचे पार्ट्स आपण टाकून देतो किंवा भंगारवाल्याकडे जमा करतो. या भंगाराच्या वस्तूंचे काय करता येईल याबाबत फारसा विचार होताना दिसून येत नाही. गौरवने भंगारांपासून नवी कोरी बाईक तयार केली होती. ही बाईक पेट्रोलवर चालणारी असून १ लीटर पेट्रोलमध्ये ८० किलोमीटर चालते.
जुगाड म्हणून चक्क गाईच्या पोटाला स्क्रिन बनवून सिनेमा बघत बसले; IPS अधिकारी म्हणाले....
विशेष म्हणजे ही बाईक दिसायलाही खूप छान आहे. एखाद्या महागड्या बाईकप्रमाणे या बाईकचा लूक आहे. ही बाईक चालवतानाचे फोटोही गौरवने शेअर केले आहेत. तीन वर्षांपूर्वीसुद्धा त्यानं अशीच एका बाईक तयार केली होती. पण बाईक जास्त वेगानं चालत नव्हती. त्यानंतर ही बाईक तयार करण्यासाठी गौरव प्रयत्न करत होता. अखेर त्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला.