ब्लॉगर लोकांना वेगवेगळ्या गोष्टी कळाव्या म्हणूण नको नको ते करत असतात. असाच एका फूड ब्लॉगरचा वेगळा प्रयत्न तिला चांगलाच महागात पडला. चीनची ब्लॉगर Kuaishou प्रसिद्धीच्या नादात आपला जीव धोक्यात टाकला. तिने एका लाइव्ह स्ट्रीमिंग दरम्यान जिवंत ऑक्टोपस खाण्याचा प्रयत्न केला. पण ऑक्टोपसने तिच्यावरच हल्ला केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.
World Wide Leaks नावाच्या यूट्यूब चॅनलने हा व्हिडीओ ४ मे रोजी शेअर केला होता. ही बातमी लिहित असेपर्यंत या व्हिडीओला २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले.
या व्हिडीओत बघितलं जाऊ शकतं की, Kuaishou जिवंत ऑक्टोपस खाण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच हा आठ हातांचा समुद्री जीव तिच्या तोंडावर चिकटतो. त्यानंतर तो तिचा गाल खाण्याचा प्रयत्न करतो. महिला पूर्ण ताकदीने त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. मोठ्या प्रयत्नांनंतर त्याला चेहऱ्यावरून दूर केलं जातं. तिच्या गालावर ऑक्टोपसच्या चावण्याची जखमही दिसते.
Kuaishou ही जगभरात 'सीसाइड गर्ल लिटिल सेवन' नावानेही ओळखली जाते. ती चीनच्या लियानयुंग शहरात राहते. हा व्हिडीओ संपल्यावर ती शेवटी म्हणाली की, 'मी याला पुढच्या व्हिडीओत खाणार'.