गेला पाहुणा म्हणून, आला नवरा बनून; एका कमाल लग्नाची धमाल गोष्ट
By Manali.bagul | Published: January 5, 2021 07:20 PM2021-01-05T19:20:39+5:302021-01-05T19:26:05+5:30
Viral Trending News in Marathi : ही घटना वाचून सुरूवातीला तुमचा विश्वासच बसणार नाही. लग्न मंडपातून नवरा मुलगा पळून गेल्यानंतर तर मुलीकडच्या मंडळीने पाहूण्यालाच जावई बनवून घेतलं.
(Image Credit- bangaloremirror)
तुम्ही नशिबावर विश्वास ठेवत असाल किंवा नसालही, त्यानं फारसा फरक पडत नाही. जे व्हायचंय हे झाल्याशिवाय राहणार नाही. अशीच एक घटना सध्या समोर आल आहे . योगायोगाने का होईना या घटनेत एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. ही घटना वाचून सुरूवातीला तुमचा विश्वासच बसणार नाही. लग्न मंडपातून नवरा मुलगा पळून गेल्यानंतर तर मुलीकडच्या मंडळीने पाहूण्यालाच जावई बनवून घेतलं. विश्वास बसला नाही ना? होय असंच झालंय.
असा घडला प्रकार
चिकमंगळूर जिल्ह्यातील तारिकेरे तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. याठिकाणी लग्नाच्या आदल्या दिवशी एक मुलगा आपल्या गर्लफ्रेंन्डसह पळू गेला. रातोरात फरार होऊन त्यानं लग्नातून काढता पाय घेतला. लग्नाच्या मंडपात जेव्हा नवरा मुलगा पळाल्याचं कळलं तेव्हा मुलीकडच्या मंडळींनी मंडपात उपस्थित असेलेल्या पाहूण्याशी आपल्या मलीचं लग्न लावून दिलं आहे.
बंगलुरू मिररच्या रिपोर्टनुसार दोन भाऊ, अशोक आणि नवीन यांनी एकत्र एकाच ठिकाणी लग्न करायचे होते. शनिवारी नवीन आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीनं एकत्र फोटो काढले आणि नातेवाईकांचे आशिर्वाद घेतले. पण जेव्हा रविवारी लग्नाचा दिवस आला तेव्हा नवीन आपल्या गर्लफ्रेंडसोबत पळून गेला.
अरेरे! माय-लेकीला झाला कोरोना; उपचारादरम्यान आईनं जगाचा निरोप घेतला; अन् लेक म्हणाली...
समोर आलेल्या माहितीनुसार नवीनच्या गर्लफ्रेंडने कुटुंबियांसमोर येऊन वीष पिऊन मरण्याची धमकी दिली होती. त्यामुळे नवीने हे पाऊल उचलले. तेव्हापासून नवीनचा काही ठावठिकाणा लागलेला नाही. लग्नाच्या दिवशी नवीनचा भाऊ अशोकने सात फेरे घेतले आणि लग्न केलं. सिंधूचे कुटूंब बराचवेळ धक्क्यातच होते.
याला म्हणतात भक्ती! मंदिरासमोर मारुतीरायाला अखेरचं दंडवत घातलं अन् वानरानं सोडले प्राण
सिंधूने लग्नमंडपात आपल्या नशींबाचं रडगाण सुरू केलं. तेव्हा उपस्थित सदस्यांनी निर्णय घेतला की आपण लग्नमंडपातच नवरामुलगा शोधायचा. नोकरीने बीएमटीसीचे कंडक्टर असलेले चंद्रप्पा देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. चंद्रप्पानं जाहिर केले की, दोन्ही कुटुंबाची परवानगी असल्यास मी लग्न करायला तयार आहे. दोन्ही कुटुंबांनी मिळून होकार दिल्यानंतर सिधू आणि चंद्रू यांचे लग्न पार पडले. सोशल मीडियावर हे आगळे वेगळे लग्न चर्चेचा विषय ठरले आहे.