शिक्षण ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचा भाग होण्यासाठी मानसिक आणि शारिरीक रुपाने मुलांना तयार केलं जातं. जेणेकरुन ते जीवनाच्या प्रवासात वेगाने पुढे जाऊ शकतील. शाळा ही केवळ सकाळी उठून, आंघोळ करुन, टिफिन पॅक करुन आणि खांद्यावर बॅग ठेवून जाणे इतकंच नाहीये. या चक्राच्या माध्यामातून एक पिढी तयार केली जाते. त्यामुळेच कदाचित जास्तीत जास्त देशांमध्ये बजेटचा एक मोठा भाग शिक्षणावर खर्च केला जातो.
शिक्षणाचा विषय हा शिक्षकांचा उल्लेख केल्याशिवाय अपुरा आहे. नुकताच शिक्षण दिनही साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आम्ही तुम्हाला अशाच काही शाळांबाबत सांगणार आहोत ज्यांच्याबाबत वाचून तुम्ही अचंबित व्हाल. हे वाचून अशाही शाळा असतात? असा प्रश्न तुम्हाला पडेल.
एबो एलिमेंट्री स्कूल
या शाळेबाबत जाणून घेतल्यावर तुम्हाला वाटेल की, न्यू मेक्सिको आर्टिस्टातील लोकांना आधीच हे माहीत होतं की, शितयुद्धादरम्यान बॉम्ब हल्ला होईल. कदाचित त्यामुळेच त्यांनी एक अशी शाळा सुरु केली जी जमिनीच्या वर नाही तर जमिनीच्या खाली आहे. ही केवळ एक शाळाच नाही तर एक आश्रमही आहे. या शाळेत प्रवेश करण्यासाठी तीन मार्ग आहेत. एका एका दरवाज्याचा भार ८०० किलो इतका आहे. म्हणजे आत कोंडले गेले तर मुलं दरवाजा उघडूही शकणार नाहीत.
ग्रे स्कूल ऑफ विजार्डी
या शाळेबाबत वाचून तुम्ही हैराणा व्हाल. ही शाळा हॉरी पॉटरमधील डंबलडोरसारख्या दिसणाऱ्या ग्रेल एवनहर्टने सुरु केलं आहे. या शाळेची स्थापना २००४ मध्ये केली गेली. इथे ऑनलाईन शिक्षण मिळतं. यासोबतच इथे एकूण १६ विभाग आहेत ज्यांमध्ये हॉरी पॉटरसारखा काळी जादू विभागही आहे.
ब्रूक लिन फ्रि स्कूल
या शाळेबाबत वाचल्यावर इथे तुम्हालाही अॅडमिशन घेण्याची इच्छा होईल. या शाळेत ना परीक्षा होत ना रिझल्ट लागत ना अटेंडंसची काही अडचण आहे. इतकेच काय तर इथे होमवर्कही नाहीये. प्रत्येकाला आपल्या इच्छे प्रमाणे वाट्टेल तो विषय निवडता येतो. इथे शिकवण्यासाठी बीएड या पदवीचीही गरज नसते. या शाळेत शिक्षकच नाहीयेत. विद्यार्थीच शिक्षक असतात आणि त्यांना मॉनिटर म्हटलं जातं.
ट्राबाजो या स्कूल
स्पेनमध्ये असलेली ही शाळा जगभरात विचित्र कारणासाठी प्रसिद्ध आहे. कारण या शाळेमध्ये देहविक्रीबाबत बारीक-सारिक गोष्टी सांगितल्या जातात. यासाठी लोक इथे पैसे देऊन अॅडमिशन घेतात आणि आश्चर्यकारक बाब म्हणजे या शाळेला येथील सरकाने मान्यता दिली आहे.
हेजल वूड अकॅडमी
स्कॉटलॅंडची ही शाळा फारच विचित्र आणि वेगळी शाळा आहे. या शाळेत त्या मुलांना शिकवलं जातं ज्यांना बघता आणि ऐकता येत नाही. या शाळेच्या भीतींपासून ते जमिनीपर्यंत एक खासप्रकारचं डिझाइन आणि व्हायब्रेशन आहे. इथे ही मुलं स्वत: आपला मार्ग निवडतात. या शाळेतील सर्व मुलं स्वत: आपली कामे करतात.
टिंकरिंग स्कूल
या शाळेत मुलांना पुस्कती ज्ञान दिलं जात नाही. इथे ६ वर्षांच्या मुलांपासून ते दहावीत शिकणाऱ्या मुलांपर्यंत शिकवलं जातं. इथे जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात कशी करायची हे शिकवलं जातं. येथील शिक्षकांचं म्हणनं आहे की, तुमच्याकडे जर व्यावहारिक ज्ञान असेल तर तुम्हाला डिग्रीची गरज नाही. इथे विद्यार्थ्यांना पेन आणि पेन्सिल नाही तर हत्यार दिले जातात.
टेन्ट स्कूल
२०१० मध्ये पोर्ट ओउ प्रिन्समध्ये सगळंकाही उध्वस्त झालं होतं. यूनिसेफने मुलांना लवकरात लवकर शिक्षण मिळावं यासाठी टेंट स्कूल सुरु केले होते. यूनिसेफच्या या प्रयत्नांना यशही मिळालं होतं.
मोबाईल स्कूल
इथे विद्यार्थी शाळेत नाही तर शाळा त्यांच्याकडे येते. कोलंबिया आणि अमेरिकेमध्ये प्रसिद्ध ही शाळा स्पेन आणि ग्रीसमध्येही फार पसंत केली जात आहे.
बेयरफुट स्कूल
राजस्थानच्या अजमेरमधील तिलोनिया या छोट्या गावात एक वेगळीच शाळा आहे. ही शाळा संजीत रॉयने १९७० मध्ये गरीब लोकांसाठी तयार केली होती. या शाळेतून अनेकांना वेगवेगळी कौशल्य शिकवण्यात आली होती.