एका छोटीशी गोळी शरीरात जाते आणि व्यक्तीचा जीव शरीरातून बाहेर फेकते. सिनेमा असो वा प्रत्यक्षात सामान्यपणे असंच होतं. पण तुम्ही कधी विचार केलाय का की एका बंदुकीच्या गोळीत असं काय असतं की, ती लागताच व्यक्तीचा मृत्यू होतो?
आधी तर हे समजून घ्यावं लागेल की, बंदुकीतील गोळी काम कसं करते. बंदुकीचा ट्रिगर दाबल्यावर जे कार्टिज निघतं, त्याचे तीन भाग असतात. प्रायमर, बॉक्स किंवा केस आणि बुलेट. कार्टिजचा सर्वात मागचा भाग प्रायमर असतो. याने फायरिंगवेळी बारूदमध्ये स्फोट होतो. मधे केस असतं. यातच दारूगोळा भरलेला असतो. गोळी चालवताच केस बंदुकीतून निघून खाली पडतं.
आता येतो तो भाग जो एखाद्या व्यक्तीच्या शरीराला चीरत आत शिरतो. कार्टिजच्या सर्वात पुढच्या भागाला बुलेट म्हणतात. हा भाग लेड किंवा शिसे या विषारी पदार्थापासून तयार केला जातो. जेव्हा बंदुकीचा ट्रिगर दाबला जातो. तेव्हा प्रायमरवर वेगाने वार होतो. या वारामुळे बुलेट केसमध्ये स्पार्क निर्माण होतो आणि केसमधील दारूगोळ्यात स्फोट होतो. यामुळे केस बुलेटपासून वेगळा होऊन जमिनीवर पडतो. स्फोट झाल्याने बुलेट वेगाने पुढे जाते.
गोळीने मृत्यू कसा होतो?
शिसे एक विषारी पदार्थ असतो. याने मृत्यू होण्याची शक्यता कमी असते. तसेही गोळीमुळे मृत्यू होण्याची अनेक कारणे असतात. एक बुलेट वेगाने एकदम सरळ शरीराच्या आत शिरते. आपल्या मार्गात येणारी स्कीन आणि शरीराच्या आतील अवयवांना चिरत बाहेर निघते. अनेकदा हाडांना भिडल्याने शरीरातच अडकून राहते.
अशात गोळी लागल्याने शरीरातून रक्त निघणं सुरू होतं. जास्त रक्त वाहून गेल्याने व्यक्तीचा मृत्यू होतो. अनेकदा अशा अवयवांवर गोळी लागते ज्याने शरीर लगेच निष्क्रिय होऊ लागतं. जसे की, हृदय किंवा मेंदू. अनेकदा अर्ध जळालेल्या दारूगोळ्यामुळेही व्यक्तीचा मृत्यू होतो. बुलेट शरीरात जेव्हा शिरते तेव्हा फार गरम असते. अशात अवयव डॅमेज होऊ शकतात. जे नंतर मृत्यूचं कारण ठरतात.