अनेक मोठ्या हॉटेल्समध्ये ते सगळं काही मिळतं जे एका व्यक्तीला रोज गरजेचं असतं. याचा अर्थ हा की टूथपेस्टपासून ते साबणापर्यंत सगळं दिलं जातं. काही हॉटेलमध्ये रोज शॅम्पू आणि साबण बदलतात. पण काही हॉटेल असं करत नाहीत. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, हॉटेलमध्ये रोज बदलल्या जाणाऱ्या शिल्लक राहिलेल्या किंवा एकदा वापरलेल्या साबणांचं काय होतं?
हॉटेलमध्ये शॅम्पू आणि साबणाचा वापर लिमिटेड होतो. पण त्या वस्तूंचं नंतर काय केलं जातं. असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. चला तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, हॉटेलमध्ये एक-दोनदा वापरलेल्या साबणांचं काय होतं?ज्या वस्तूंचा आपण वापर करत नाही आणि ज्या वस्तू पॅक्ड असतात त्या अनेकजण आपल्या जवळच्या लोकांना किंवा नातेवाईकांना देतात. मुळात एका रिपोर्टनुसार, या वस्तू कचऱ्याच्या डब्यात टाकल्या जात नाहीत. हॉटेलमधील या वस्तू गरीबांची स्वच्छतेची समस्या सोडवण्यासाठी उपयोगात आणल्या जातात.
याचा अर्थ हा आहे की, हॉटेलमधील वापरलेल्या साबण अशा गरीब लोकांना दिल्या जातात जे लोक ते खरेदी करू शकत नाहीत वा जे लोक प्रदूषणामुळे वेगवेगळ्या आजारांनी पीडित आहेत. २००० साली काही संस्थांनी यावर चर्चा केली होती.रिपोर्टनुसार दररोज हॉटेल्सच्या रूममधून हजारो वस्तू घेतल्या जातात. ज्यांपासून गरीबांना फायदा होतो. क्लीन द वर्ल्ड आणि जगातील काही इतर संस्थांनी एकत्र येऊन ही समस्या दूर करण्यासाठी ग्लोबल सोप प्रोजेक्ट नावाचं एक संयुक्त अभियान सुरू केलं आहे.
या अंतर्गत हॉटेलमधून घेण्यात आलेल्या साबणांचा वापर नवीन साबण तयार करण्यासाठी केला जातो. नंतर या वस्तू वेगवेगळ्या गरीब देशांमध्ये पाठवल्या जातात. या देशात राहणारे गरीब लोकही या अभियानाचा लाभ घेतात. यासाठी अनेक संस्था काम करतात. हे लोक हॉटेल्समधून वेगवेगळ्या वस्तू मिळवतात आणि त्या स्वच्छ करून, पुर्ननिर्माण करून गरीबांमध्ये वाटतात. त्यांची शुद्धताही तपासली जाते. त्याशिवाय ते कुणाला दिले जात नाहीत.